26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKhedमुसळधार पावसामुळे खेड बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे खेड बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी

दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी संतप्त झालेले पाहायला मिळाले.

खेड तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस कोसळला. शहरात गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट अनेक दुकानांमध्ये घुसला. गटारे साफ न केल्याने पावासाचे पाणी तुंबल्यामुळे गटातील माती, कचरा पाण्याच्या लोंढयासहीत दुकानात शिरल्याने दुकानातील साहित्यांचे नुकसान झाले. गटारे साफ न केल्याने व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सोमवारी पावसाने धुवांवार बॅटिंग करत खेड शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे गटारे मोकळी केली न गेल्याने ने खेड शहरातील गांधी चौकात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गटारे तुंबल्याने पाण्याचा लोंढा अनेक दुकानात शिरला. व्यापाऱ्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधल्यानंतर अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली.

खेड शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक या ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे संपूर्ण पाण्याचा लोंढा हा दुकानांमध्ये शिरला तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी संतप्त झालेले पाहायला मिळाले. नगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, काही काळ खेड शहरातील गांधी चौक या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. जर पावसाळयापुर्वीच गटारे साफ केली असती तर अशी परिस्थितीच उद्भवली नसती. त्यामुळे काम चुकारपणा व अधिकारी व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष याबद्दल व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular