26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriमाजलेल्या हुकूमशहाला इंडिया आघाडीने जागा दाखवली:विनायक राऊत

माजलेल्या हुकूमशहाला इंडिया आघाडीने जागा दाखवली:विनायक राऊत

रत्नागिरी जिल्ह्यात सर्व मतदारसंघात आपल्याला मताधिक्य मिळालेले आहे.

‘लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी सत्तेत मदमस्त होऊन माजलेल्या हुकूमशहाला इंडिया आघाडीने विशेषतः सामान्य जनतेने त्याची जागा दाखवून दिली त्याचे समाधान नक्कीच आहे. पराभवाने मी खचलेलो नाही. तुम्हीही खचून जाऊ नका, मी घरांत बसणारा कार्यकर्ता नव्हे. यापुढील सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठी ठामपणे उभे राहून विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ असा ठाम विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी चिपळूण शहरात आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश कदम, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख सचिन कदम जिल्हाप्रमुख संजय कदम, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश किर, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पैशाचा तुफान वापर – यावेळी विनायक राऊत म्हणाले निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो. या निवडणुकीत ज्या प्रमाणे तुफान पैशाचा वापर केला ते पाहता थोडीशी कुणकुण लागली होतीच. सुमारे दीडशे कोटी रुपये उडवण्यात आले असा आरोप त्यांनी केला. परंतु मतदारांनी आपल्याला देखील मोठा सन्मान दिला असे विनायक राऊत म्हणाले. आपण – एक ही रुपया कोणाला न देता चार – लाख मते मिळवली. ही आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. मतदारांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला जे प्रेम दिले त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी आलो आहे.

गाफील राहिलो – पण आपण देखील गाफील राहिलो. कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता. तसेच विजयाची शंभर टक्के खात्री डोक्यात घर करून राहिली आणि येथेच विरोधकांनी संधी साधली. हा गाफीलपणा पुन्हा होता कामा नये. रत्नागिरी जिल्ह्यात सर्व मतदारसंघात आपल्याला मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे पाच ही आम दार महाविकास आघाडीचे निवडून येतील. पण गाफील राहिलात तर घात होईल. आता जागरूक रहावे लागेल. आता पासूनच कामाला लागा, प्रत्येक जिल्हापरिषद गटात जा, मतदान यादी समोर ठेवा आणि काय चुकले, ‘कुठे कमी पडलो हे लोकांना बरोबर घेऊन चर्चा करा, असे आवाहन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

पदवीधर निवडणूक – आता लगेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यासाठी आपल्या मतदारांपर्यंत पोहचा. एक-एक मत मतदान केंद्रपर्यंत आणून मतदान करून घ्या. रमेश किर आपले उमेदवार आहेत. अनुभवी आणि अभ्यासू आहेत. त्यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे. पैशाच्या बाबतीत आपण भाजपचा मुकाबला करूच शकत नाही. हजारो कोटी रुपये लुबाडून गब्बर झालेले भाजपवाले प्रत्येक निवडणुकीत पैशाचा हैदोस घालतील, पण आपल्याकडे संपर्क असेल, सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ घट्ट झालेली असेल तर आपण विजय नक्कीच मिळवू शकतो. त्यासाठी समन्वय आणि संपर्क कायम ठेवा, मी सदैव तुमच्या बरोबर असेन, मी आपल्यात अंतर पडू देणार नाही. असा ‘विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

RELATED ARTICLES

Most Popular