27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriएक्सप्रेस गाड्याना संगमेश्वररोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन

एक्सप्रेस गाड्याना संगमेश्वररोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन

कोकणामध्ये येण्यासाठी रेल्वे मार्गाने केलेली वाहतूक नक्कीच आरामदायी ठरते. महामार्गावरील खड्डे चुकविताना वाहनासकट, शरीराला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचण्याचा धोका संभवतो. त्यामुळे स्वत:चे वाहन असून सुद्धा अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला प्रथम पसंती देतात. पण सर्वच रेल्वे गाड्यांना सर्वच स्थानकांवर थांबा मिळत नाही. काही ठराविक गाड्या या येणाऱ्या सर्व स्थानकांवर थांबतात, काही एक्स्प्रेस गाड्या या लहान स्थानकांवर न थांबता फक्त ठराविक असलेल्या ४-५ स्थानकावरच थांबतात. पण त्यामुळे प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील विविध सामाजिक, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे, राजकीय संस्था, रिक्षा संघटना आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात कोव्हिड संदर्भातील सर्व नियम पाळून निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण या फेसबुक समूहातर्फे समूह प्रमुख संदेश झिमण आणि त्याचे सहकारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

संगमेश्वर स्थानकामध्ये अप-डाऊन अशा मिळून एकूण दहा गाड्या थांबतात. पण काही गाड्या वेळेवर  येत नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन गाड्या दिवसाच्या वेळेत येत असल्याने त्या प्रवाशांना सोयीच्या ठरतात, पण त्या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर मध्ये थांबा नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समूह प्रमुख संदेश झिमण यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular