27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरिफायनरी समर्थन करणाऱ्यास धमकीचे फोन आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसात तक्रार करावी- अॅड.शशिकांत...

रिफायनरी समर्थन करणाऱ्यास धमकीचे फोन आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसात तक्रार करावी- अॅड.शशिकांत सुतार

रत्नागिरीतील राजापूर मध्ये उभारणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. कालांतराने या विचारांमध्ये बदल होऊन, रिफायनरीच्या समर्थनात अनेक गावे जोडली गेली आहेत. भविष्याचा विचार करता, हा प्रकल्प खूपच हिताचा ठरणार असल्याचे अनेकांचे मत झाले असल्याने, दिवसेंदिवस या प्रकल्पासाठी समर्थन वाढतच आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून, कोकणच्या विकासामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यां नागरिकांना काहीजण धमक्याचे फोन करत आहेत. रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष  अॅड. शशिकांत सूतार यांच्यासह अन्य रिफायनरी समर्थक संघटनांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्वाही दिली आहे कि, समर्थन करणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशा पद्धतीचा अनुभव आल्यास त्याने तात्काळ स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करावी. समर्थन करणाऱ्या सर्व संघटना व आपल्या सोबतची वकील मंडळी त्यांच्या सोबत तातडीने उभे राहतील.

रिफायनरी समर्थकांना धमक्या दिल्याबददल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी समन्वय समिती अध्यक्ष अॅड. सुतार,  नाटे- सोलगाव- देवाचेगोठणे दशक्रोशी समर्थक समितीचे डॉ.सुनील राणे, बारसू,गोवळ, शिवणे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती अध्यक्ष हनिफ काझी, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे आवाहन केले आहे. वेगवेगळ्या व्हाट्सअप गुपवर प्रकल्पाबाबत नाहक गैरसमज पसवणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या  अथवा अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या मेसेजेसचे स्क्रीन शॉटस टाकून तसेच कोणत्याही स्वरूपाच्या दहशतीचा मार्ग अवलंबणाऱ्या सर्व विरोधकांची एक यादी तयार करावी व त्याचे संकलन करून त्याची माहिती आमच्यापाशी जमा करावी.

संबंधित व्यक्तींची माहिती सरकार तसेच प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करण्यात येईल, व त्यांना प्रकल्पातील नोकऱ्या अथवा व्यवसायात समाविष्ट करू नये अशा स्वरूपाचे लेखी निवेदन सरकार व प्रकल्प अधिकाऱ्याकडे समिती मार्फत करण्यात येईल,  असेही या प्रसिध्दी पत्रकामध्ये जाहीर करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular