29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraमुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत.

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग काढत वाहने व नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणताही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये रुग्णालयात पाणीच पाणी झालं आहे. ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, येथील ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत.

रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात एक तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत काहीशी विश्रांती घेतलेल्यानंतर एक तासापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. रात्री १० वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू असून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत.

रायगडात थैमान – रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच सर्जिकल वार्डमध्ये पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अलिबागच्या मुख्य रस्त्यावरही अशीच परिस्थिती दिसून आली, येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे

भोर-वरंधा घाट बंद – मागील काही दिवसापासून पावसाळी खबरदारी आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने महाड वरंधा भोर घाट प्रशासनाने बंद केला होता, तरीदेखील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करत होते. वरंधा घाटातील वाघजाई मंदिरा शेजारी असणाऱ्या एका वळणातील रस्ता खचल्याने पुणे जिल्हा प्रशासन आणि रायगड प्रशासनाने हा घाट बंद केला. मात्र, तरीदेखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे उघड होताच रायगड जिल्हा प्रशासनाकडून आता या घाटातून कोणतेच वाहन जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेण्यांत आली आहे. या घाटातील मध्य रस्त्यावर मोठा मोठाले दगड, आणि बॅरिकेटिंग लावले आहेत.

सिंधुदुर्गात रेड अलर्ट – सिंधुदुर्गात रविवारी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, उद्या जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पावसाची संततधार सुरूच आहे.

धोधाणीत २ जण बुडाले – अकोला जिल्ह्याच्या पातूर तालूक्यातील धोधाणी येथील धबधब्यावर बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोन्ही युवक अकोल्याचे असून त्यांचा शोध सुरू आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने धोधाणी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. असते, त्यामुळे हे तरुणही पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते.

पालघरातही नद्या तुडूंब – पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झाली असून आज दिवसभरच वर्षाव सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात लावण्या खोळंबल्या असून ठिक-ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.. दुसरीकडे नदी नाले ओसंडून व्हायला सुरुवात झाली असून सूर्या नदीला पूर आला आहे. हवामान खात्याकडून अजूनही पावसाची. शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular