26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKhedकोयना, पोफळी परिसराला भूकंपाचा बसला सौम्य धक्का

कोयना, पोफळी परिसराला भूकंपाचा बसला सौम्य धक्का

रिश्टर स्केलवर २.८ नोंद झाली आहे.

पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. २.८ रिश्टर स्केलचा हा धक्का होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता.. भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका नाही अशी माहिती देण्यात आली. कोयना धरण आणि परिसराला वारंवार भूकंपाचा धक्का बसतो. पाटण तालुक्यासह शेजारील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातही या भूकंपाचा केंद्रबिंदू राहतो.

आतापर्यंत अनेकवेळा कोयना परिसराला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. बुधवारी दुपारीही ३ वाजून २६ मिनिटांनी कोयना परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर २.८ नोंद झाली आहे. हा धक्का सौम्य प्रकारचा होता. या भूकंपाचा धक्का पाटण तालुक्यातील कोयनानगर तसेच शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या पोफळी परिसराला बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता. तसेच या भूकंपाची खोली १५ किलोमीटर होती.

RELATED ARTICLES

Most Popular