23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanखड्यांमध्ये सिमेंटमिश्रीत दगडाची भुकटी ओतून महामार्गावर खड्डे बुजविण्याचा केवळ देखावा?

खड्यांमध्ये सिमेंटमिश्रीत दगडाची भुकटी ओतून महामार्गावर खड्डे बुजविण्याचा केवळ देखावा?

खड्डे बुजविण्याचा देखावा सुरू करण्यात आला होता.

इंदापूर ते वीरदरम्यान खड्डे बुजवण्याचा देखावा सुरु असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर घेण्यात आलेला ४ दिवसांचा मेगाब्लॉक हा चक्क डम्परमधून सिमेंटमिश्रीत दगडाची भुकटी म्हणजेच ग्रीट खड्यांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम ठरल्याची वस्तुस्थिती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सम ोर आणली आहे. दि. ११ ते १३ जुलैदरम्यान दिवसांतून दोन वेळा हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या काळात कोलाडजवळील पुई येथील पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉक दरम्यान इंदापूर ते वीर दरम्यानच्या महामार्गावर देखील खड्डे बुजविण्याचा देखावा सुरू करण्यात आला होता असे अनेक प्रवाशांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

पळस्पे ते इंदापूर दरम्यानचे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १२ वर्षे रखडले असून कासू ते इंदापूर दरम्यानच्या पुलांची कामेदेखील रूंदीकरण पूर्णत्वाला जात आले तरी रखडलेले दिसून येत आहे. पुई येथील नियोजित पुलावर गर्डर बसविण्याकामी वाहतूक महासंचालक कार्यालयामधील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी या पुलावर गर्डर बसविण्यासाठी ११ ते १३ जुलैदरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यास मान्यता देऊन या कालावधीमध्ये महामार्गावरील वाहतूक पुणे बंगलोर रस्ता व अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्याची अधिसूचना जारी केली होती. याच दरम्यान पुई येथील पुलावर गर्डर बसविण्यासाठी ६ गर्डर आणि हे गर्डर पुलावर चढविण्यासाठी यंत्रसामग्री आणून ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

या मेगाब्लॉक दरम्यानच्या महामार्गावरील वाहतुकीला बंदीदरम्यान इंदापूर ते वीर रेल्वे स्टेशनदरम्यान संबंधित ठेकेदारांकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी डम्परमध्ये सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटी थेट डंम्परमधून खड्डयांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता असा आरोप आता अनेकजण करत आहेत. याच दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाची संततधार कोसळत असल्याने खंड्यांतील सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीचे मिश्रण चिखलमय होऊन वाहनांचे टायर या भरावावरून गेल्याने मिश्रण खड्डड्याबाहेर पडू लागल्याने या मिश्रणाचे उंचवटे तयार होऊन खड्डे बुजण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे सध्या इंदापूर ते वीर दरम्यान जिथे जिथे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला तिथे वाहनांना खड्डे आणि उंचवट्यांमधून वाट काढताना प्रचंड हेलकावे बसत असल्याचे सार्वत्रिक दृश्य दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular