25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको

रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको

अशी मागणी कोकणवासीय प्रवासी जनतेतून होत आहे.

रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना आदेश देवून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा रेल्वे रोको सारखे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा जिल्ह्यातील, कोकणातील प्रवाशांनी दिला. दादर येथे पोचल्यावर कोकणवासिय प्रवाशांना टॅक्सी, बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेनमधून मुंबईच्या उपनगरात जाणे सोपे व सोईचे होत आहे.

याची गंभीर दखल विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी घेवून रत्नागिरी दिवा दादरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलावीत आणि कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना तसे आदेश द्यावेत. जेणेकरून रत्नागिरी दादर पॅसेंजर मधून प्रवाशांचा होणारा प्रवास सुरक्षित होवून होणारी गैरसोय दूर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकणवासीय प्रवासी जनतेतून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular