29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeEntertainmentया अभिनेत्रीला झाला मुलगा

या अभिनेत्रीला झाला मुलगा

गेल्या जवळपास दीड वर्षांमध्ये कोरोना काळात अनेक अभिनेत्रींनी आपली लग्न उरकून घेतली होती आपल्या सर्वांची ची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या काळामध्ये लग्नाच्याबेडी मध्ये अडकली. सोनालीने त्याचे फोटो देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ला हल्लीच अपलोड केलेले आहेत. या काळात अनेक अभिनेत्रींनी आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.. आई बनून !

मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. उर्मिला हिला तीन ऑगस्ट रोजी मुलगा झाला असून इंस्टाग्राम सोशल माध्यमाद्वारे तिने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिलेली आहे. तिची डिलिव्हरी c-section द्वारे अर्थात सिझेरियन पद्धतीने झाली आहे याबाबत बोलताना उर्मिला म्हणाली, अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत.

urmila nimbalkar

उर्मिला निंबाळकर हे मराठी अभिनेत्री असून ती खास करून प्रसिद्ध आहे तिच्या स्पष्टवक्तेपणा बद्दल आणि तिच्या यूट्यूब चॅनल बद्दल तिचा गरोदरपणाचा पूर्ण प्रवास व्हिडिओ माध्यमातून तिने लोकांसमोर प्रसिद्ध केला आहे अगदी डोहाळे जेवण देखील तिने आपल्या प्रेक्षकांसमोर युट्युब माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले होते. पूर्ण मराठी चित्रपट इंडस्ट्री मधून तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या रत्नागिरीकर टीम कडून देखील उर्मिला हिला आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा !

RELATED ARTICLES

Most Popular