29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriरत्नागिरीत दोघांवर मुंबई एटीएसची कारवाई

रत्नागिरीत दोघांवर मुंबई एटीएसची कारवाई

रत्नागिरीतील बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवणाऱ्या दोघांचा मुंबई एटीएस च्या मदतीने रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रत्नागिरी आठवड्या बाजारामध्ये श्री टेक चे मालक अरविंद विचारे यांच्या दुकानांमध्ये कॉलिंगचा सर्वर बसवण्यात आला होता. मुंबई एटीएस कडे रत्नागिरी मधून इंटरनॅशनल कॉलिंग होत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे रत्नागिरी पोलीस या सर्व प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

मुंबई एटीएसला मिळालेल्या माहिती नुसार रत्नागिरीतून सुरू असलेले अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणांमध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. दहशतवादी कारवाई करण्यासाठी अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर केला जातो, अशी माहिती या संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे. कॉलिंग सेंटर एका ठिकाणी असून ऑपरेट दुसऱ्या ठिकाणाहून केले जाते.

रत्नागिरी आठवडा बाजारातील विचारे यांच्या दुकानात इंटरनॅशनल कॉलिंग सर्वर बसवलेला असून ऑपरेट मात्र मुंबई वांद्रे येथून केले जात आहे, याची माहिती मुंबई एटीएस पथकाला मिळाल्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणात छडा लावण्याचे काम सुरू आहे.

या इंटरनॅशनल कॉलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी फैजल रजाक अली रजाक्क सिद्दिकी हा पनवेल येथील रहिवासी असून रत्नागिरीमध्ये येत असल्याची खबर मुंबई एटीएस पथकाला मिळाली. रत्नागिरी पोलीसांच्या सहाय्याने फिल्डिंग लावून त्याला साळवी स्टॉप येथेच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणांमध्ये रत्नागिरीतील अरविंद विचारे आणि फैजल सिद्दिकी या दोघांच्याही विरोधात पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांकडून या प्रकरणातील इत्यंभूत माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये अशा प्रकारची सुद्धा प्रकरणे समोर येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular