23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeChiplunचिपळूणच्या रस्त्यावर तुफान हाणामारी भलत्यालाच धोपटले?

चिपळूणच्या रस्त्यावर तुफान हाणामारी भलत्यालाच धोपटले?

पोलीस स्थानकात मात्र याविषयी काहीही नोंद करण्यात आली नव्हती.

चिपळूणच्या रस्त्यावर कविळतळीमध्ये जोरदार मंगळवारी मोठा राडा झाला. निमित्त झाले ते एका बाईकने दुसऱ्या बाईकला ठोकल्याचे. ठोकले म्हणजे, गाडी थोडीशी बाईकवर आपटली. ज्या बाईकला ही धडक बसली ती बाईक एक महिला चालवत होती. या छोट्याशा अपघातानंतर त्या बाईकवरील महिला निघून गेल्या मात्र येथे रस्त्यावर असलेल्या काही ‘अति उत्साही’ मंडळींनी काहीही विचार न करता एका जाडजूड माणसाची दे दणादण धुलाई सुरु केली. आपला काही संबंध नाही असा तो सांगत होता मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते, या मारामारीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

वड्याचे तेल वांग्यावर निघाले अशी चर्चा सुरु होती. ही धुलाई सुरु होताच बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती. गर्दीतील अनेकांना नेमके काय झाले हे देखील ठाउक नव्हते. मात्र ही मारामारी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी साऱ्यांची. धडपड सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. खरतर लोक ज्याला मारत होती त्याचा त्या अपघाताशी काहीही संबंध नव्हता. तो काकुळतीला येऊन आपला काही संबंध नाही हे सांगायचा प्रयत्न करत होता.

मात्र लोक एवढी चिडली होती की त्याचे कोणीच ऐकत नव्हते. हातांनी बुकलून झाले… त्यानंतर शेजारी असलेले सामानाचे खोके काहींनी त्याच्यांवर फेकून मारले. शेकडो लोकं हा राडा पाहायला उपस्थित होते. या हाणामारीची चर्चा मंगळवारी दिवसभर काविळतळी आणि संपूर्ण चिपळूण शहरात सूरु होती. पोलीस स्थानकात मात्र याविषयी काहीही नोंद करण्यात आली नव्हती.

RELATED ARTICLES

Most Popular