30.8 C
Ratnagiri
Wednesday, January 15, 2025

मत्स्यविभाग ‘अॅक्शन मोड’वर, दोन एलईडी मासेमारी नौका पकडल्या

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश...

कोकणात प्लास्टिक, कचऱ्याने खाड्या धोक्यात

प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाऊचे रॅपर्स, घरगुती कचरा...
HomeRatnagiri१५८ एसटी फेऱ्या रद्द केल्याने एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान

१५८ एसटी फेऱ्या रद्द केल्याने एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान

५० लाख भरल्याशिवाय महामंडळाला डिझेल टँकर मिळणार नाही.

रत्नागिरी एसटी विभागाचा आर्थिक पाय आणखी खोलात रुतला आहे. इंधन पुरविणाऱ्या ऑइल कंपन्यांसह स्पेअरपोर्ट, टायर, कर्मचारी वेतन, देखभाल दुरूस्तीचे सुमारे १५ कोटी एसटी देणेकरी आहे. उधारीच्या मर्यादेबाहेर ऑईल कंपन्यांचे देणे असल्याने रोख ५० लाख भरल्याशिवाय महामंडळाला डिझेल टँकर मिळणार नाही. शनिवार, रविवार कमी प्रवासी भारमान झाल्याने महामंडळाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यात टँकर मागविणे शक्य नसल्याने एसटीला डिझेल तुटवड्याला तोंड द्यावे लागले. त्यामुळे सोमवारी शहरी, ग्रामीण भागातील १५८ एसटी फेऱ्या रद्द होऊन मोठे नुकसान सोसावे लागले.

रत्नागिरी एसटी विभागावर सोमवारी डिझेल टंचाईचा बाका प्रसंग ओढावला. डिझेलची चणचण होती याची कल्पना एसटी विभागाला होती. म्हणून एसटी विभागाने देवरुखहुन डिझेल मागविले होते. परंतु पंपाने एअर पकडल्याने तांत्रिक बिघाडाने ते डिझेलही गाड्यांमध्ये भरता आले नाही. परिणाम सकोळी साडे आकरानंतरच्या रत्नागिरी शहर आणि ग्रामीणच्या फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला. अचानक गाड्या न आल्याने प्रवाशांची ससेहोलपट झाली. वेळेवर गाड्या नं आल्याने सायंकाळी तर विद्यार्थ्यांचे हाल झाले. याबाबत एसटी विभागाकडुन अपेक्षित माहिती मिळत नव्हती.

मंगळवारी याची माहिती एसटी विभागाने, दिली. डिझेल तुटवड्यामळे काल रत्नागिरी विभागातील शहरी आणि ग्रामीण भागातील १५८ फेऱ्या रद्द झाल्या. दिवसाला या गाड्या सुमारे ५ हजार ७९४ किमी धावतात. त्या सोमवारी धावल्या नाहीत. या गाड्यांना दररोज १० हजार लिटर डिझेल लागते. सोमवारी ऑईल कंपन्यांकडून डिझेल घेतले. परंतु पंपाने एअर पकडल्याने ते गाड्यांमध्ये भरता आले नाही, असे एसटी प्रशासनाने सांगितले. मिरजहुन डिझेल टैंकर आला असून आता वाहतूक सुरळीत झाली आहे. जिल्ह्याला सुमारे ५६ हजार लिटर डिझेल लागले. यावर ७२० बसेस धावतात.

RELATED ARTICLES

Most Popular