21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरामदास कदमांविरुद्ध भाजप, प्रत्येक तालुक्यात आंदोलन

रामदास कदमांविरुद्ध भाजप, प्रत्येक तालुक्यात आंदोलन

कदमांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली.

शिवसेनचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जिल्ह्यात भाजप आक्रमक झाला आहे. प्रत्येक तालुक्यात कदमांविरोधात भाजपने निषेध आंदोलन केले. रत्नागिरीत शहर आणि ग्रामीण भाजपने दोन ठिकाणी कदमांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला पायदळी तुडवत घोषणाबाजी केली. रामदास कदम यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने म्हणाले, “महायुतीमधील नेते म्हणून रामदास कदम यांच्याबद्दल आदर आहे; परंतु आता त्यांचे वय झाले आहे. वयामुळे त्यांचा तोल सुटत आहे. आम्ही तुमच्यासारखे बोलू शकत नाही.

आम्ही सुसंस्कृत भाजपच्या मुशीतले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ते ज्या वृद्धाश्रमाचे प्रमुख आहेत तेथे जावे. कृपा करून योगेश कदम यांचे भवितव्य बिघडवू नका. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका. रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात रामदास कदम यांनी जे वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत. रामदास कदमांनी हे वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी; अन्यथा आंदोलन तीव्र करू. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सचिन वहाळकर, राजन फाळके, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, महेंद्र मयेकर, राजेश तोडणकर, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

योगेश कदम युतीमुळे आमदार झाले. भाजपने त्यांना मतदान केल्याने २०१९ मध्ये ते विजयी झाले. चंद्रकांत पाटील यांनी दापोलीसाठी ५०० कोटींचा निधी दिला. मुंबई-गोवा महामार्ग राणेंनी राजापूरपासून पुढे पूर्ण केला. आरवली ते वाकेडचा रस्ता अपूर्ण आहे. तो का झाला नाही याचा शोध घ्या, एमईपी कंपनीला कोणी त्रास दिला. ह्यान इन्फ्रा कंपनीला कोणी त्रास दिला, याचा शोध लावा. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी देखील रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजपचे नेते महामार्गासाठी झटतात – मुंबई – गोवा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे २०१४ ला झाला. १५ हजार कोटी तरतूद चौपदरीकरणासाठी केली. त्यामुळे नरेंद्र मोदी, गडकरी आदींचे अभिनंदन करतो. या मार्गाचे वांद्री २०१४ ला भूमिपूजन झाले होते. याची आठवण मुद्दाम करून द्यायची आहे. २०१६ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. ज्या पद्धतीने भाजपचे नेते महामार्गासाठी झटत आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular