24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriजागतिक छायाचित्रण दिन

जागतिक छायाचित्रण दिन

पूर्वीच्या काळी छायाचित्रण करणे म्हणजे खूपच दुर्मिळ गोष्ट होती. काही सण समारंभ, वाढदिवस यांची आठवण राहावी यासाठी फोटो काढले जात असत. ते सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचे. कालांतराने याचे रुपांतरण व्यवसायामध्ये होऊन, त्यामध्ये विविध बदल देखील झाले आहेत. पूर्वी रोलचा कॅमेरा असायचा, मग ते काढलेले फोटो धुवून त्याची प्रिंट दिली जात असे, पण कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी साधारण पंधरा दिवस तरी वाट पाहावी लागत असे. त्यानंतर आलेला डिजिटल कॅमेरा ते सध्या असलेला मोबाइल इथपर्यंत काळासह छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली आहेत.

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स संलग्न रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स वतीने जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स व रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इन्फिगो आय केअर हॉस्पीटल, रत्नागिरी यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील व जिल्हातील सर्व फोटोग्राफर बंधूंचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे दुपारी १२ ते सायं ६ वाजेपर्यत मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तरी या जागतिक छायाचित्रण दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व फोटोग्राफर्स व छायाचित्र प्रेमीनी सहभागी होवून नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स संलग्न रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स वतीने कांचन मालगुंडकर ९४२२५७६७३६  व गुरू चौगुले ९७३०४१४४४७  यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे या दिवशी रत्नागिरी येथील आशादीप या संस्थेला रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स दुपारी १२ वा. सदिच्छा भेट देणार आहेत. जागतिक छायाचित्रण दिन हा प्रत्येक छायाचित्रकारांच्या कार्याला प्रोत्साहित करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद करून त्यांना कायम स्मरणात ठेवले आहे. अशा सर्व छायाचित्रकार बंधू भगिनींना त्यांच्या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Most Popular