20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraबालभारती प्रकाशनाच्या कृतीवर आक्षेप

बालभारती प्रकाशनाच्या कृतीवर आक्षेप

बालभारतीच्या द्वारे काढण्यात आलेल्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेली तब्बल ४२६ टन पुस्तके बालभारती रद्दीत काढणार असल्याच्या निविदेबद्द्ल प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून त्यावर अनेक वाद निर्माण झाले आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या सुरु न झाल्याने बाल भारतीकडून गोदामात शिल्लक असलेली ४२६ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीला काढण्यात आली आहेत. बालभारतीने नव्याने छापलेली लाखोंच्या संख्येने पुस्तके राज्यातील ९ विविध ठिकाणच्या गोदामात पडून आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, पनवेल आणि नाशिक येथील  बालभारतीच्या गोदामांचा समावेश आहे. या सर्व गोदामांमध्ये पडून असलेली पुस्तके आता रद्दीत काढण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झाली असल्याने ही पुस्तके गोदामांत पडून आहेत.

कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष शाळा बंद होत्या त्यामुळे ऑफलाईन शिक्षण बंद असून ऑन लाईन शिक्षण सुरु करण्यात आले होते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मागील आणि यंदाच्या वर्षी देखील शैक्षणिक वर्षाची पुस्तके प्राप्त झालेली नाहीत. आणि असे असताना बालभारतीकडून इतक्या मोठ्या संख्येने पुस्तके रद्दीत काढून, ती बाद केली जाणार असल्याने त्यावर शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकी मोठ्या संखेने पुस्तक रद्दीत देण्यापेक्षा, पुस्तके राज्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचवली गेली नाहीत ! आणि यासाठी कोण जबाबदार आहे,  असे प्रश्‍न आता निर्माण होऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular