31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर...

लांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

जीवनसाथी अॅपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने...

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...
HomeChiplunचिपळूण रेल्वेस्टेशनवर क्युआर कोड'द्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा

चिपळूण रेल्वेस्टेशनवर क्युआर कोड’द्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा

प्रवांशाकरिता एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस सुविधेचे उद्घाटन झाले.

कोकण रेल्वेमार्गावरील चिपळूण रेल्वेस्थानकात क्युआर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे आदा करण्याची सुविधाही सुरू केली आहे. त्याचा लाभ गणेशोत्सवात होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेकरिता नवे दालन खुले करण्यात आले आहे. चिपळूण स्थानकात प्रवांशाकरिता एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस सुविधेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत झाले. चिपळूण रेल्वेस्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा सुरू केली आहे.

वातानुकूलित लाऊंजमध्ये विविध प्रकारच्या आरामदायी २३ सोफ्यांची व्यवस्था केलेली आहे. रेल्वे वाहतुकीच्या नियमित माहितीसह येथे वायफाय सुविधा, उपहारगृह, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रसाधनगृह अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. क्युआर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे आदा करण्याची सुविधाही चिपळूण रेल्वेस्थानकात सुरू केली आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फीत कापून या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.

कोकण रेल्वेचे अध्यक्ष तया व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत या सुविधांचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी चिपळूण रेल्वेस्थानकात एक नवी सुविधा प्रवाशांकरिता सुरू केल्याचे समाधान अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular