29.3 C
Ratnagiri
Monday, November 25, 2024

सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) :- 266 रत्नागिरी...

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपुढल्यावर्षी लवकर या अशी साद घालत लाडक्या गणपतीबाप्पाला भक्तांचा निरोप

पुढल्यावर्षी लवकर या अशी साद घालत लाडक्या गणपतीबाप्पाला भक्तांचा निरोप

५ दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या थाटामाटात मिरवणुका काढल्या जातात.

गणपती बाप्पा.. मोरया.. मंगलमूर्ती म ोरया… च्या जयघोषात ढोल-ताशांचा गजर.. गुलाबाची उधळण करीत आणि पुढल्यावर्षी लवकर या अशी साद घालत गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन मंगलमय वातावरणात पार पडले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार २३४ घरगुती तर १७ सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. रत्नागिरीत मांडवी समुद्रकिनारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. जिल्ह्यात ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. त्यानंतर दीड दिवसाच्या उत्सवातील १२ हजार गणेश मुर्तीचे विसर्जन झाले. ५ दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या थाटामाटात मिरवणुका काढल्या जातात.

रत्नागिरीत गर्दी उसळली – शहरातील भाट्येसह मांडवी, पांढरा समुद्र आदी ठिकाणी गणेश विसर्जन पार पडते. वाजतगाजत बाप्पाच्या मिरवणुका याठिकाणी येत होत्या. गुरुवारी सायंकाळी ४ वा. नंतर शहरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. मांडवी समुद्रकिनारी मोठी गर्दी पहायला मिळाली.

मोरयाचा गजर – सायंकाळी ४ वा. नंतर शहरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. त्यानंतर एका रांगेत घरगुती गणपती आणि काही सार्वजनिक गणपती विसर्जन करण्यासाठी मांडवी समुद्रकिनारी निघाले होते. यावेळी म ोरयाचा गजर रस्त्या रस्त्यावर भाविक करत होते.

डीजेचा दणदणाट – आगमन मिरवणूक असो वा विसर्जन मिरवणूक असो गणेशभक्त म ोठ्या उत्साहात या मिरवणुका काढतात. फटाक्यांची आतषबाजी त्यातच डीजेचा दणदणाट आणि ढोलताशांचा गजर विसर्जन मिरवणुकांमध्ये पहायला मिळाला. अनेकभक्त डीजेच्या ठेक्यावर थिरकताना पहायला मि ळाले. यामध्ये महिलावर्गदेखील मागे नव्हता.

मंगलमूर्ती प्रतिष्ठानची पुष्पवृष्टी – सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्यावतीने मांडवी किनारी पुष्पवृष्टी करण्यात आली. दरवर्षी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानकडून ही पुष्पवृष्टी केली जाते. मिरवणुकीतील गणरायाच्या मुर्तीसह भक्तांवरही पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, सुधाकरराव सावंत, दिपक राऊत, राजू भाटलेकर, राकेश चव्हाण, प्रा. प्रतापराव सावंतदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

चोख बंदोबस्त – विसर्जन मिरवणुकीवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह डीवायएसपी म ाईणकर आदी अधिकाऱ्यांनी विसर्जन ठिकाणी भेट दिली.

न.प.चा स्तुत्य उपक्रम – समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी समुद्रकिनारी निर्माल्य कलश ठेवला होता. तसेच गणेशमूर्ती’ संकलनासाठी वाहनाची व्यवस्था केली होती. एका

असे झाले विसर्जन – जिल्ह्यात एकूण पोलीस ठाणेनिहाय खासगी व सार्वजनिक गणेशमूर्तीची संख्या अंशी : रत्नागिरी शहर ५ हजार ८२५, ग्रामीण ७ हजार ८५९, जयगड १ हजार ७३५, संगमेश्वर ९ हजार १८३, राजापूर १० हजार ६७४, नाटे ४ हजार ६३४, लांजा ११ हजार ७७०, देवरूख ८ हजार २९५, सावर्डे ९ हजार ३२२, चिपळूण ९ हजार ८४७, गुहागर ९ हजार, १५०, खेड १० हजार ६३२, अलोरे ५ हजार ३५०, दापोली २ हजार ५००, मंडणगड २ हजार ८४४, बाणकोट ३९५, पूर्णगड ४ हजार ३२१, दाभोळे ८९८, तर सार्वजनिक १७ असे एकूण १ लाख १५ हजार २३४ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

RELATED ARTICLES

Most Popular