जमिनीचा सात बारा म्हटले की, शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा. पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलिकडचा होता. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाकडून त्यात नुकताच बदल करण्यात आला आहे. सुमारे पन्नास वर्षांनंतर झालेल्या ११ बदलांमुळे सातबारा उतारा अधिक सोपा, सुटसुटीत आणि सर्वसामअन्यांना कळेल, अशा भाषेत आता शेतकऱ्यांच्या हाती मिळणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने २०१३ पासून ई-फेरफार हा ऑनलाईन कार्यक्रम हाती घेतला. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत हो आज्ञावली विकसित करून घेण्यात आली.
जुलै २०१७ पासून लिखित उतारे बंद करून, पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात देण्यास सुरुवात झाली. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणून या. सातबाऱ्याच्या नमुन्यात बदल करून तो अधिकाधिक लोकाभिमुख होईल, हे पाहिले गेले आहे. नव्या उताऱ्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासन असा लोगो, ई महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क आणि जो सातबारा उतारा आहे, त्या गावाचा कोडहौ असणार आहे. हा उतारा आडव्या स्वरुपात असणार आहे. गाव नमुना नंबर ७ हा अधिकार अभिलेख म्हणजेच यातून जमिनीची मालकी दिसते. गाव नमुना नंबर १२ हा पीक नोंदवही म्हणजेच पीकपाण्याची नोंद दर्शविणारा असतो.
आतापर्यंत शेतजमिनीसाठी एकच सातबारा होता. पण नव्या बदलामध्ये शेती व बिगरशेतीसाठी वेगवेगळे उतारे असणार आहेत. शेतीसाठी सातबाराचा रकाना असणार आहे. बिगरशेतीसाठीच्या उताऱ्यातून १२ हटविण्यात आले आहेत. केवळ मालकी दर्शविणारा सातचा उल्लेख असणार आहे. अलीकडे बिगरशेती करून जमिनी बांधकामासाठी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पीकपाण्याचा रकाना काढल्यामुळे आता त्यांना पूर्ण शेतकरी असल्याचा लाभ घेता येणार नाही. गावाच्या नावासोबत एलजीडी कोड असणार आहे. लागवड योग्य व खराब पोट क्षेत्राबरोबरच एकूण क्षेत्र दिसणार आहे.
शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मिटर, तर बिगरशेतीसाठी आर चौरस मीटर एककाचा वापर होणार आहे. खाते क्रमांक इतर हक्काच्या रकान्यांत कंसात टाकण्या ऐवजी खातेदाराच्या नावासमोर असणार आहे. मयत खातेदार संपूर्ण विक्री केलेले क्षेत्र व इतर हक्कातील कमी केलेला कर्जबोजा अथवा ई- कराराच्या नोंदी कंसात दाखवल्या जात होत्या. यापुढे कमी केलेले नाव आणि नोंदी कंस करून एक आडवी रेषा मारून दर्शवली जाणार आहे. यापूर्वी नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार व इतर हक्क रकान्यातील स्वतंत दर्शविण्यात येईल.
अंतिम फेरफार क्रमांक तारखेसह इतर रकान्याच्या खाली अंतिम फेरफार असा नवीन रकाना तयार करून त्यात दिसणार आहे. सर्व जुने फेरफार हे जुने फेरफार म्हणून केलेल्या नवीन स्कान्यात दिसणार आहेत. कोणत्याही दोन खात्यांतील नावांमध्ये डॉटेड लाईन असणार आहे. बिनशेती क्षेत्रात पोट खराब, विशेष आकारणी, तसेच इतर हक्कांत कूळ व खंड है रकाने वगळण्यात येणार आहेत. बिनशती क्षेत्रात गाव नमुना नंबर १२ छापून, त्यात बिगरशेतीमध्ये रुपांतरित झाले असल्याचे लिहिण्यात येणार आहे.