27.3 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriबेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणी पोलिसांच्या हाती आणखी धागेदोरे

बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणी पोलिसांच्या हाती आणखी धागेदोरे

रत्नागिरीतील आठवडा बाजार मधील सायबरमधून आंतरराष्ट्रीय कॉल केल्याचा प्रकार १२ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याची माहिती समोर येताच जिह्यात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती (एटीएस) राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली होती. रत्नागिरीमधून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल केले जात असल्याची माहिती मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून मिळाल्यानंतर, रत्नागिरी पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यानुसार सायबर चालक अलंकार अरविंद विचारे आणि  सूत्रधार फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांना ८ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा ठोठवण्यात आली, त्याची मुदत आज संपल्याने शनिवार २१  ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात येणार आहे.

संशयित आरोपींकडून मिळालेली माहिती पुरेशी नसून रत्नागिरी पोलिसांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे मुंबईतील आणखी दोन सर्व्हर पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पनवेल येथे दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. सर्व्हरचा उपयोग नक्की कोणत्या कामासाठी केला जात आहे, यासंदर्भात तपास आता केला जात आहे.

पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये संगणकासह अन्य काही साहित्य हाती लागल्या आहत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गती प्राप्त होत आहे. यातील मुख्य सूत्रधार फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीमध्ये पनवेल येथे दोन कॉल सेंटर उभारल्याचे सांगितले  होते. अजून तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पोलीस  कोणते साक्षी पुरावे न्यायालयासमोर प्रदर्शित करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular