23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरी तालुक्यात सातच कृषी सहायक, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी

रत्नागिरी तालुक्यात सातच कृषी सहायक, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी

रत्नागिरी, पावस, मालगुंड व पाली यांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे. कारण रत्नागिरी तालुक्यामध्ये सध्या फक्त सात कृषी सहायक कार्यरत असून, त्यांच्याकडे अतिरिक्त गावांचा पदभार असल्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे मुश्कील झाले आहे. त्यातही पाचजण आपापल्या जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये कृषी विभागाची चार मंडळ कार्यालय अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, पावस, मालगुंड व पाली यांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याकरिता कृषी सहायक हा महत्त्वाचा दुवा समजला जातो. एका मंडळ कार्यालयामध्ये १२ कृषी सहायक पदे अपेक्षित असतात. त्याप्रमाणे तालुक्यात ४८ कृषी सहायक असणे अपेक्षित आहे.

शासन निर्णयानुसार यापूर्वी या प्रत्येक मंडळ कार्यालयामध्ये कृषी सहायकांची संख्या परिपूर्ण होती; परंतु सध्या या मंडळ कार्यालयांतर्गत गावांमध्ये कृषी सहायक नसल्यामुळे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे असलेल्या कृषी सहायकांना अतिरिक्त गावांचा पदभार सांभाळावा लागत आहे. मागील वर्षी या तालुक्यांमध्ये नऊ कृषी सहायक कार्यरत होते. त्यातील दोन कृषी सहायकांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपली बदली गावाकडे करून घेतल्याने सध्या सात कृषी सहायक कार्यरत आहेत.

त्यातील पाच कृषी सहायक विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या गावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये कृषी सहायक शोधण्याची वेळ येणार आहे. दर पाच वर्षांनी कृषी सहायकांची पदे भरली जातात. त्यामध्ये स्थानिक उमेदवारांना समाविष्ट केले जात नाही. कोकण मंडळामध्ये भरती प्रक्रियेमध्ये विदर्भ, मराठवाडा, आदी भागांतील उमेदवार अर्ज भरत असल्यामुळे त्यांची नेमणूक केली जाते. सेवेमध्ये पक्के झाल्यानंतर सदर उमेदवार त्यांच्याकडील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपली बदली करून घेतात. त्यामुळे या जागा रिक्त होतात. ही साखळी गेली अनेक वर्ष तालुक्यामध्ये सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular