27.2 C
Ratnagiri
Tuesday, January 27, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriजिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बाधणीस परवानगी - अॅड. दीपक पटवर्धन

जिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बाधणीस परवानगी – अॅड. दीपक पटवर्धन

इतके जुने वाचनालय हे रत्नागिरीचे सुसंस्कृत संस्कृतीचा दाखला आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयला थासनाने ३० वर्षाचे भाडेतत्वावर जागा दिली, त्यासाठी नोंदणीकृत करारही झाला असून, वाचनालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून नत्या स्वरूयात वाचनालयाची दोन मजली इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. नवरात्र ते दीपावती दरम्यान नव्या इमारत बांधकामाचा प्रारंभ केला जाणार आहे. नवी वास्तू एक वर्षाच्या आत उभी करण्याचा मानस आहे. या वाचनालयाच्या नूतनीकरणासाठी ३ कोर्टीचा खर्च अपेक्षित असून ४३ लाख रुपयांचा निधी दानशूर व्यक्तींकडून जमा केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी २५ लाख रुपये उपलब्ध करून देणार आहेत.

वाचनालयाची उत्तम वास्तू परत उभी राहावी यासाठी रत्नागिरीतीठ नागरिक बंधू-भगिनी, वित्तीय संस्था, कंपन्या, अन्य आस्थापना यांनी योगदान द्यावे, यासाठी आवाहन करणार असल्याचे अॅड. पटवर्धन बांनी सांगितले. १९९१ साली जागेबाबतचा करार संपुष्टात आला होता. करार परत होण्यासाठी प्रदीर्घ काळाची लढत यशस्वी झाली आणि आता वाचनालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा रस्ता मोकळा झाला. १९७२ साली वाचनालयाची ही इमारत उभी राहिली. त्यानंतर इमारतीचे विस्तारीकरण दोन टप्प्यात झाले. १९९६ साली दुसरा मजला बांधला गेला, मूळ बांधकाम ठोड बेरिंग व त्यावर आरसीसी स्टॅब अशी रचना होती.

ही इमारत आता खूप जुनी म्हणजे ५२ वर्षांची झाली. आता ती पाहून पुनर्बाधकाम करणे अनिवार्य आहे. लिज अॅग्रिमेंट होत नसल्याने, नवीन बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळे आहे, ते जुने बांधकाम व्यवस्थित ठेवण्यासाठी वाचनालयाने गांभीयनि सतत प्रयत्न केले व इमारत सुस्थितीत राखली. मात्र, आता स्ट्रक्चरल ऑडिटरनेही इमारत धोकादायक असा अहवाल दिला, आवश्यक तांत्रिक परवानम्या प्राप्त करण्याचे काम पूर्ण झाले असून नवीन इमारत उभी करण्यात येणार आहे.

१ लाख ग्रंथसंग्रह – रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय १९६ वर्षाचे महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे. १ लाख १४ हजारांचा ग्रंथसंग्रह या वाचनालयाची शान वाढवत आहे. इतके जुने वाचनालय हे रत्नागिरीचे सुसंस्कृत संस्कृतीचा दाखला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular