21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणकन्या, मांडवीला सौंदळ स्थानकावर थांबा द्यावा, नारायण राणेंना निवेदन

कोकणकन्या, मांडवीला सौंदळ स्थानकावर थांबा द्यावा, नारायण राणेंना निवेदन

सौंदळ स्थानकावर सोयीसुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होते.

कोकण रेल्वेमार्गावरील सौंदळ स्थानकावर होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर छप्पर बांधण्यात यावे आणि या स्थानकावर मुंबईला जाणाऱ्या व रेणाऱ्या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी रायपाटण गावातील भास्कर गांगण आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्यामार्फत हे निवेदन माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर गांगण यांसह श्रीधर गांगण, विशाल गांगण, महेंद्र गांगण, सुरेंद्र गांगण, रमेश गांगण, गणेश गांगण, आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील सौंदळ येथे थांबा असून, सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे पन्नास ते साठ गावांसाठी हे स्थानक सोयीचे आहे. या गावांतील प्रवाशांना मुंबईला ये-जा करणे रेल्वेने परवडणारे आहे. खासगी गाड्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवास्तव भाड्यामुळे रेल्वे प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे; मात्र सौंदळ स्थानकावर सोयीसुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होते. दिवा-सावंतवाडी गाडी वगळता अन्य कोणतीही गाडी या स्थानकावर थांबत नाही. तसेच कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस या गाड्या या स्थानकावर थांबविल्या तर प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

महिला व वृद्धांची गैरसोय – रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला प्लटॅफॉर्म नाहीत. तसेच रेल्वेथांब्याच्या ठिकाणी छप्पर नसल्यामुळे महिला व वृद्धांची गैरसोय होते. वयोवृद्ध नागरिक, महिला व मुलांना प्लॅटफॉर्म उंच असल्याने चढताना त्रास होतो. कधी कधी गर्दीमुळे चढ-उतार करताना प्रवाशांना दुखापत होते. त्यामुळे या सौंदळ रेल्वे स्थानकावर सुविधा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular