29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...
HomeDapoliकरून दाखविले ! - किरीट सोम्मय्यांचे ट्वीट

करून दाखविले ! – किरीट सोम्मय्यांचे ट्वीट

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या दापोली मुरुड मधील नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.  प्रथम रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड किनार्यालगत बांधण्यात आलेल्या अनधिकृत रिसोर्टवरून किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अर्जावरून बऱ्याच प्रमाणात गोंधळ माजला होता, अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची या प्रकरणामध्ये नावे पुढे आली होती. त्याचप्रमाणे “मुख्यमंत्री कार्यालयाचा अशा अनधिकृत काम करणाऱ्या राजकीय नेत्यांवर वरदहस्त असल्याने आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनावर दबाव जास्त असल्याने, अशी कामे केली जात असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.

त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांचे स्वीय सचीव मिलिंद नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेल्या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असून, तो सीआरझेड कायद्याचा भंग करत असून, ते बांधकाम तोडण्यात यावे अशी तक्रार दाखल केली. आणि सतत त्या तक्रारीचा त्यांनी पाठपुरवठा देखील केला. त्यामुळे या गोष्टीला राजकीय वळण लागून, चर्चेला जोर आला. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आल्यामुळे आज सकाळी हा बंगला पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.

किरीट सोमय्या यांनी मिलींद नार्वेकरांचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त करण्यात आल्याच्या  कारवाईचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत “करून दाखविले” ! असे पोस्ट केले आहे. आत्ता पुढचा नंबर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा लागणार असून, उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular