26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeKhedकाव काव सरकार XXX घोषणांनी खेड दणाणले

काव काव सरकार XXX घोषणांनी खेड दणाणले

प्रशासनाने सांगितले होते की गणेशोत्वसापुर्वी व्यापाऱ्यांना नक्की मदत देऊ.

शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड शहरातील पूरग्रस्त नागरिकांसोबत बुधवारी तहसील कार्यालयात साखळी उपोषणाला बसले होते. यावेळी उपोषणकर्त्यांनी काव काव शिंदे सरकार xxx अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी संजय राव म्हणाले की २३ सालापासून हे सरकार व्यापाऱ्यांना व पूरग्रस्त नागरिकांना फसवत आहे. अशा या फसव्या सरकारचा आम्ही निषेध करतो. त्यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. आम्हाला प्रशासनाने सांगितले होते की गणेशोत्वसापुर्वी व्यापाऱ्यांना नक्की मदत देऊ.

मात्र गणपती विसर्जन होऊनही नवरात्र सुरु झालं तरीही हे सरकार अजून झोपलेलो आहे. त्यामुळे अशा सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही साखळी उपोषण करत आहोत असे संजय कदम म्हणाले. यावेळी शहर प्रमुख दर्शन महाजन, राजन संसारे, पिंट्या जोशी, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, संदीप नायकवडी, शितल एजन्सीचे बापू खातू यांच्यासह अनेक व्यापारी हे उपोषण स्थळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular