21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgआता बदल हवो तर आमदार नवो! मोती तलावाकडे दिवे लावलास म्हणजे 'इकास' नाय ओ बाबानू

आता बदल हवो तर आमदार नवो! मोती तलावाकडे दिवे लावलास म्हणजे ‘इकास’ नाय ओ बाबानू

बॅनरवर मालवणी भाषेत दीपक केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे लिहिले आहे.

इकास, इकास आणि इकास… पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास. पण भाईनू, मोती तलावाकडे ४ दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ! अशा आशयाचा बॅनर बुधवारी सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठ्यावर पहायला मिळाला. आता बदल हवो तर आमदार नवो, अशी टिपणीही या बॅनरवर करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर या बॅनरची चर्चा सर्वत्र एकायला मिळत होती. राजकारणात तर बॅनरने खळबळ उडवून दिली आहे. हा बॅनर नक्की कोणी लावला हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

सावंतवाडी मतदारसंघामध्ये आगामी विधानसभेच्या तोंडावर दीपक केसरकर यांच्या विरोधात मालवणी भाषेत लावण्यात आलेला हा बॅनर आणि आणि त्यातील मजकूर हा हा म्हणता सर्व जिल्हाभर पसरला आणि एकच चर्चा सुरू झाली. या बॅनरवर मालवणी भाषेत दीपक केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे लिहिले आहे. दीपक केसरकर यांनी अनेक घोषणा केलेले प्रकल्प हवेत कसे विरले याची कुंडलीच या बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे. गेली १५ वर्ष केसरकरांनी काय काय घोषणा केल्या हे या बॅनरमधून मांडली आहे.

काय म्हटलं आहे बॅनरमध्ये ? – प्रिय दिपकभाईनू, कसा काय? बरा हा मा? भाईनू, आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजा होतो पण दर येळाक आमच्या भावनांची खेळ केलास मवो. इकास, इकास आणि इकास….. पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास पण भाईनू, मोती तलावाकडे ४ दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ! म ागच्या इलेक्शनच्या टायमाक सांगलास सेटटॉप बॉक्सचो कारखानो आणतय, पोरग्यांका नोकरी गावतली. आशेन तुमका मता घातलव तुमचो कारखानो काय यवक नाय. तुमी गायब आणि कारखानोसुद्धा गायब. आसा तो सेट्टॉप बॉक्स रीचार्ज मारून घामटा भायर सरला.

त्याच्च्या आधीच्या इलेक्शनच्या टायमाक सांगलास चष्म्याचो कारखानो आणतय म्हणान. वाट बघून बघून आमच्या चष्म्याचो नंबर वाडलो, पण तुमची कारखानो काय येवक नाय! आता यंदाच्या इलेक्शनच्या तोंडार सांगतास जर्मनीक व्हरतय आणि नोकरी देतय म्हणान. भाईन्, हयत्त्या हय १५ वर्षा तुमका शक्य होवक नाय जर्मनीत काय दिताल्यास ? कशाक ओ आमच्या पोरग्यांका फसवतास? ओ भाई, सावंतवाडीत टॉय ट्रेन हाडतंय म्हणान सांगि लेलात… आठवता? टॉय ट्रेन सोर ओ. पण सावंतवाडी टर्मिनलचा मिपूजन केलास पण पुढे काय्येक नाय, नरेंद्र थय सुधा फसयलास ! डोंगरार टी हाऊस आण णान पत्रकार परिषद घेऊन स… लास. आठवता? टी आसत. हाऊस मात्र खय दिसत नाय ।

भाईन्, २०१९ साली भूमिपूजन ता मल्टिस्पेशालिटी केलेल्यात हॉस्पिटल आठवता? अजून एक ईट पण रचाक नाय! आता म्हणतास वेळागरचा ताजचा भूमिपूजन करतय म्हणान. भाईन्, ताजसाठी १९९५ सालात धयच्या लोकांचे जमिनी त्यावेळच्या सरकारान घेतले. तुम्ही २००९ पासून आमदार आसात हयचे. ८ वर्षा मंत्री वर आणि तेतूर ४ येळा विकासासाठी म्हणान पक्ष बदलात ! जा तुमका सत्तेत असताना १५ वर्ष जमाकं नाय ता आता कसा होताला? वो ता सोडा भाईनू… दहशतवाद दहशतवाद म्हणान २०१४ मधे आमका घाबरवलास, आम्ही भियान तुमका मता घातलव. १० वर्षा नंतर बगतव विरोधकांच्या रडारवर दीपक केसरकर.

दुसरीकडे, लाडक्या बहिणीसाठी पैसे कमी पडू नये, यासाठी अन्य सर्व योजनांचानिधीयायोजनेसाठीवळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हा आरोप खरा आहे की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर, अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचा दर्जा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणवेशाच्या दर्जावरून हल्लाबोल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular