26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा गंडा

रत्नागिरीमध्ये १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा गंडा

कोविडच्या महासंकटामुळे अनेक जणांचे आर्थिक, मानसिकरित्या बऱ्याच प्रमाणात हाल झाले आहेत. सुरु असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊन घरी राहण्याची अनेकांवर वेळ आली आहे. बेरोजगारीची कुर्हाडड अनेक जणांवर आली आहे. अनेक जण आपला चरितार्थ भागविण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करत आहेत. तर अनेक जण काही अनैतिक गोष्टींचा सहारा घेऊन, अशा गरजू लोकांची फसवणूक करत आहेत.

इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून तब्बल १२६ जणांना अंदाजे ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रत्नागिरीमध्ये उघडकीस आल्याने, याप्रकरणी विशाल सुभाष गुरव याने शनिवारी सायंकाळी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिसांनी मुनाफ अब्दुल रज्जाक भाटकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार १७ सप्टेंबर २०१७ ते ६ सप्टेंबर २०१९ या कालावधी पासून सुरु आहे.

फिर्यादीनुसार, संशयित मुनाफ भाटकर याने सन २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये विशाल गुरव याला इंडियन कोस्टगार्ड, रत्नागिरी येथे नाविक जनरल ड्युटी, ड्रायव्हर ड्युटीकरिता नोकरीला लावतो, असे सांगून ५० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणाचे तपाससत्र सुरु असताना मुनाफ भाटकर याने आणखी काही जणांकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहेत. त्याने तब्बल १२६ जणांकडून अशाप्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले आहेत. त्याने प्रत्येकाकडून ५० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

मुनाफ भाटकर याने ६५ लाखांची रक्कम हडप केल्याचे तपासात उघड झाले. पैसे देऊनही अजून नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजतात विशालने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या घटनेचा कसून तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular