31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये अरबी समुद्रकिनारी उभारला भव्य दिव्य शिवपुतळा

रत्नागिरीमध्ये अरबी समुद्रकिनारी उभारला भव्य दिव्य शिवपुतळा

शिवपुतळ्याचे लोकार्पण होताच उपस्थितांनी एकच जयघोष केला.

ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, फटक्यांची आतषबाजी आणि महाराजांच्या जयघोषात, अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्यावर साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, बिपीन बंदरकर उपस्थित होते. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करुन रत्नदुर्ग शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी स्टॅचू गॅलरीची पाहणी केली. तेथून कळ दाबून समोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पणं करण्यात आले. शिवपुतळ्याचे लोकार्पण होताच उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी डोळ्याचे आतषबाजी करण्यात आली. यावेळी ना. सामंत म्हणाले की, कोकणातील सर्वात मोठ्या असर्णाग्रा या शिवसृष्टीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पहायला मिळेल. अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उभा पुतळा आहे. जे जे स्कूल ऑफ ऑर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular