26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraलोककलावंत शिष्टमंडळाने घेतली सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची भेट

लोककलावंत शिष्टमंडळाने घेतली सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची भेट

कोरोनाचे संकट अद्याप पूर्णत: टळलेले नसून, राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे, त्याना सध्या तरी निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, आणि निर्बंधात शिथिलता मिळाली म्हणजे, बेजबाबदार पणे वागणे असा असा त्याचा अर्थ होत नाही. आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यामध्ये लवकरच कलाकेंद्र,  आठवडा बाजार आणि सार्वजनिक यात्रा सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला गेला आहे.

अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.

शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्यासमोर अजून काही मागण्यांचे निवेदन सुद्धा दिले आहे. त्यामध्ये लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,  अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे,  वृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावी त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी पेंशन योजना कार्यान्वित करण्यात यावी, राज्यातील पारंपारिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरासाठी पुणे येथे ५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी,  सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular