32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeRatnagiriकदम 'कदम' बढाये जा! आ. योगेश कदमांच्या मालमत्तेत घसघशीत वाढ

कदम ‘कदम’ बढाये जा! आ. योगेश कदमांच्या मालमत्तेत घसघशीत वाढ

कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १४ कोटी १ लाख ५ हजार ४२१ इतकी आहे.

कोकणातील काही प्रमुख लढतींमध्ये शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या लढतीचाही समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. योगेश कदम यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती दिली आहे. गेल्या ५ वर्षात आमदार योगेश कदम यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये आ. योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत ४ कोटी ६३ लाख, स्थावर मालमत्तेत ३९ कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे पण याच वेळी कर्जातही ११ कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

जंगम संपत्ती किती ? – आमदार योगेश कदम यांच्या मालकीची ७ कोटी रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ कोटी ६० लाख ९९ हजार रुपये, मुलांच्या नावे ३९ लाख ७० हजार ६६ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. जंगम मालमत्तेत रोख रुपये ८ लाख ९९ हजार, बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक ३ कोटी ६९ लाख ८१९ रुपये असून ३३ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने आहेत. १ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत. कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १४ कोटी १ लाख ५ हजार ४२१ इतकी आहे.

स्थावर मालमत्ता किती? – योगेश कदम यांच्या नावे शेतजमीन, बिगरशेतजमीन, व्यावसायिक व निवासी अशा स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ४१ कोटी ९८ लाख २८ हजार इतकी आहे. कदम व त्यांच्या कुटुंबियांनी १५ कोटी ७० लाख ३३ हजार इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे. योगेश कदम यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात ८३ लाख ९६ हजार २६० इतके उत्पन्न दाखविले असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न १८ लाख ७९ हजार ३८० इतके आहे.

RELATED ARTICLES

Most Popular