21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgभाजपचे विशाल परब यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचे वृत्त!

भाजपचे विशाल परब यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचे वृत्त!

मळगाव रेल्वे स्टेशन जवळ निरवडे येथे अकस्म ात घटना घडली.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील उमेदवार व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. विशाल परब यांच्या इनोव्हा गाडीवर काल मध्यरात्री हल्ला चढविण्यात आल्याचे वृत्त काही अवधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते संपूर्ण कोकण व मुंबईपर्यंत जाऊन धडकले आणि मग एकच खळबळ उडाली… हल्लेखोरांच्या हातात म्हणे ‘दांडा’ होता! साहजिकच त्या ‘दांडक्या’चा प्रसाद विशाल परबना मिळाला का? व तसे घडले असल्यास ‘प्रसाद’ कितपत मिळाला? अशी शंकायुक्त काळजी व्यक्त केली जाऊ लागली… कोकणात ‘म्हण’ आहे की ‘मन चिंती ते वैरी न चिंती’! काल बुधवारी मध्यरात्री ११.३० स्टेशनजवळ निरवडे येथे ही घट्ना ते १२ चे दरम्याने सावंतवाडी घडली.

मध्यरात्रीचा सुमार – याबाबत सावंतवाडी पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा सर्व प्रकार उघड झाला. मळगाव ‘परिसरातील नरकासूर दहनाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून श्री. विशाल परब हे इनोव्हा कारने घरी येण्यास निघाले. इतक्यात मळगाव रेल्वे स्टेशन जवळ निरवडे येथे अकस्मात घटना घडली. येण्यास निघाले इतक्यात मळगाव रेल्वे स्टेशन जवळ निरवडे येथे अकस्म ात घटना घडली.

हल्ल्याचा प्रयत्न? – मळगाव रेल्वे स्टेशनजवळच्या ‘सिल्व्हर एकर’ इमारती समोरील रस्त्यावर गाडी आली असताना अचानक एका परप्रांतीय व्यक्तीने गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार या प्रकरणी ओंकार पावसकर यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिसांनी घटनेचा कसून तपास केला.

सर्वत्र बातम्या – दरम्यान काही मिनिटातच सिंधुदुर्गपासून मुंबईपर्यंत वेगवेगळ्या बातम्या धडकल्या. सर्वात पहिली बातमी दै. ‘रत्नागिरी टाइम्स’च्या ‘टाइम्स स्पेशल’ व्हॉटस्अॅप ग्रुपवर मध्यरात्री १२ वा. ३६ मि. नी प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक व्हॉटस्अप ग्रुप, डिजिटल चॅनेलवर बातम्या झळकल्या.

पोलिसांनी केली चौकशी – पोलिसांच्या चौकशील ती परप्रांतीय व्यक्ती हल्ला करण्याच्या इराद्याने तेथे आली नसल्याचे समोर आले आहे, असे पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी माहिती देताना सांगितले, कणकवली, तरळे येथे असलेल्या गावातील चिरेखाणीवर झारखंड, रांची येथील कामगार संजय गोप व त्याचा भाऊ विनोद गोप हे कामाला होते. ते झारखंड येथील गावातून सोम. दि. २८ ऑक्टो. रोजी रेल्वेने येण्यास निघाले.”

ट्रेन चुकली ! – ते बुध. दि. ३० ऑक्टो. रोजी. मडगाव जंक्शन येथे आले व तेथून कणकवली येथे येण्यास निघाले. दरम्यान संजय गोप हा डोके दुखते. म्हणून ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उत्तरला. तो पुन्हा रेल्वेत चढण्यापूर्वी ट्रेन कणकवलीच्या दिशेने निघाली. त्यामुळे त्याची ट्रेन चुकली.

संजय गोपची तगमग – मात्र त्याचा भाऊ विनोद गोप हा ट्रेनमध्ये होता, तो कणकवलीला गेला. सावंतवाडीवरुन कणकवलीला जाण्यासाठी नंतर ट्रेन नसल्याचे सम जल्यावर संजय गोप याने येणाऱ्या वाहनांना हात दाखवत कणकवलीला जाण्याचे ठरविले. त्यामुळे रेल्वे स्टेशनपासून सुमारे २०० मी. अंतरावर निरवडे गावच्या हद्दीत ‘सिल्व्हर एकर’ बिल्डींगसमोर तो वाहनांना हात दाखवत उभा राहिला.

हातात दांडा – त्यावेळी संजय गोपच्या हातात दांडा होता. रात्रीच्या वेळी जनावरांपासून संरक्षणासाठी त्याने हातात दोडा ठेवला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते व सावंतवाडीचे उमेदवार श्री. विशाल परब यांची गाडी त्या रस्त्याने येताना ‘त्याने पाहिली. गाडी थांबविण्याचा त्याने प्रयत्न केला. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरली तेव्हा त्याने घाबरुन पळ काढला.

पोलिसांच्या हवाली – आरडाओरडा झाल्याने स्थानिक ग्रामस्थ देखील आले. त्यांनी शोध घेऊन संजय गोप याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी संजय गोपकडून सविस्तर माहिती घेतली तेव्हा हे सर्व स्पष्ट झाले. दरम्यान पोलिसांनी त्यांची रेल्वे तिकीटे, आधार कार्ड आदी सर्व बाबींची तपासणी केली.

भाऊ देखील आला – तसेच तळेरे येथील चिरे खाणीवर ते जाणार होते. तेथूनही त्यांनी माहिती घेतली. दरम्यान त्याचा भाऊ विनोद गोप हा सुद्धा संजय गोपचा शोध घेत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आला. तेव्हा त्याला भाऊ संजय गोप याला पोलिसांनी पकडल्याचे समजले. त्याने सावंतवाडी पोलिसांना भेटून सर्व सविस्तर कथन केले.

चातुर्याने तपास कार्य – अशा प्रकारे चहू बाजूने पोलिसांनी नेहमीप्रमाणे ‘विलक्षण चातुर्याने व शिताफीने’ तपास केला. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले, “या प्रकरणी चौकशी केली असता हेतूपुरस्सर हल्ला करण्याच्या इराद्याने संजय गोप दांडा घेऊन रस्त्यावर आल्याचे निष्पन्न झाले नाही. तसेच श्री. विशाल परब व तक्रारदार ओंकार पावंसकर यांनीही आपली कोणाही विरुद्ध तक्तार नाही असे सांगितले”.

पोलिसांचा निर्वाळा – तसेच त्यांनी सांगितले की, “या प्रकरणी चौकशीत हल्ला चढवला असल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र अदाखलपात्र तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे”. पोलिसांनी सर्व काही स्पष्ट केल्याने सिंधुदुर्गपासून मुंबईपर्यंत पसरलेल्या अफवांचे निराकरण झाले व कोकणी माणसाने निःश्वास सोडला!

RELATED ARTICLES

Most Popular