23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeTechnologyगुगल मॅपिंग अॅपचे नवीन फीचर्स

गुगल मॅपिंग अॅपचे नवीन फीचर्स

कोणत्याही नवीन ठिकाणी जायचे असेल तर नकाशा पासून ते तेथील पर्यटक स्थळे, वाहतूक व्यवस्था, राहण्यासाठी लॉजिंग, हॉटेल्स, तिथली स्पेशालिटी इत्यादी अनेक गोष्टींची माहिती आपण गुगलमध्ये सर्च करून मिळवतो. गुगल वरील माहितीमुळे बऱ्याच ठिकाणी सहज पोहोचणे शक्य होते.

गुगलने आत्ता त्याच्या मॅपिंग अॅपमध्ये एक वेगळेच नवीन फीचर्स समाविष्ट केले आहे. त्याने केलेल्या अपडेशन नुसार आता प्रत्यके वाहन चालकाला मॅपिंग अॅपच्या मदतीने कळू शकेल की, कोणत्या रस्त्यांना टोल गेट आहे आणि तुम्हाला किती टोल टॅक्स भरावा लागणार आहे. तसेच हे मॅपिंग अॅप तुम्हाला टोल गेट रस्ता घेणे गरजेचे आहे की नाही हे सुद्धा ठरविण्यात मदत करणार आहे.

बऱ्याचदा प्रवासाला निघाल्यावर वाटेत लागणारे इतके टोल गेट पाहून आश्चर्य वाटते. पण गूगल मॅप द्वारे आपल्याला अंतिम स्थळापर्यंत पोहोचेपर्यंत, एकूण किती टोल लागतील आणि तुमच्या मार्गावर किती टोल गेट पडतील याची माहिती आधीच मिळू शकणार आहे. तर तुम्हाला टोल गेटवाल्या रस्त्याने जायचे आहे की नाही हे तुम्ही सहजपणे ठरवू शकता. हे वापरकर्त्यांना वेळ वाचवण्यासाठी देखील मदत करू शकते.

भारतमध्ये हि सुविधा सध्या तरी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. इतर देशांमध्ये हे कधी पर्यंत उपलब्ध होईल हे सांगणे सध्या कठीण होईल. त्याचप्रमाणे गूगलने या आगामी वैशिष्ट्याबद्दल अजून काहीही अधिकृत केले नसले तरी, एका अहवालामध्ये असे म्हटले आहे कि, गूगल मॅप प्रीव्यू प्रोग्रामच्या सदस्यांना आगामी वैशिष्ट्याबद्दल संदेश पाठवण्यात आला होता. आपल्या नेव्हिगेशन मार्गासाठी टोलची रक्कम प्रदर्शित करेल. प्रवास सुरु करण्यापूर्वीच हि टोलची रक्कम कळू शकते आणि वेळ वाचविण्यासाठी ती आधी सुद्धा भरता येते.

RELATED ARTICLES

Most Popular