29.1 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriस्वतःच्या स्वार्थासाठी बाळ मानेंनी बडे प्रोजेक्ट डावपेच लढवून घालवून लावले हे खरे आहे का?

स्वतःच्या स्वार्थासाठी बाळ मानेंनी बडे प्रोजेक्ट डावपेच लढवून घालवून लावले हे खरे आहे का?

इंटरनॅशनल पोर्ट व लॉजिस्टीक पार्क होणार असे जाहीर झाले.

रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघातील आघाडीचे उमेदवार श्री. बाळ माने हे अनेकदा वादग्रस्त ठरत आले आहेत. त्यांचा ‘मे. मिऱ्या पोर्ट प्रा. लि.’ या कथित कंपनीच्या माध्यमातून स्वतः चे बंदर सुरु करण्याचा मागील सुमारे १२ वर्षांपासून प्रयत्न होता. अशा स्थितीत तेथे एमआयडीसीच्या माध्यमातून इंटरनॅशनल पोर्ट व लॉजिस्टीक पार्क उभा राहिला तर मग या कथित बंदराचे काय? या चिंतेने नको नको त्या ‘आवई’ उठविण्यात आल्या. मिऱ्या ग्रामस्थांचे गैरसमज करुन दिले गेले व ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन अखेर एमआयडीसीने तो प्रकल्प रद्द केला!… याबाबत मिऱ्याचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच श्री. दिनेश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सज्जड पुराव्यासह ‘पोलखोल’ केली! श्री. दिनेश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सोम. दि. १८ नोव्हें. रोजी दुपारी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे सारे पुरावे पत्रकारांसमोर ठेवले.

हे घ्या सज्जड पुरावे ! – श्री. दिनेश सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संबंधित कागदपत्रांच्या प्रती पत्रकारांना दिल्या. त्यांनी सांगितले, “मे. मिऱ्या पोर्ट प्रा. लि. या कंपनीच्या नावे महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी दि. २१ मार्च २०१३ रोजी ‘लिज’ करार केला. या कराराच्या प्रत्येक पानावर ‘मे. मिऱ्या पोर्ट प्रा. लि.’ या फर्मचा शिक्का असून त्यावर श्रीमान बाळ माने यांची ‘एस. वाय. माने’ अशी इंग्रजीत सही आहे.

हा पत्ता कुणाचा ? – श्री. दिनेश सावंत यांनी निदर्शनास आणले की, या कंपनीचा पत्ता “कमलाश्रम, जाकिमिऱ्या, रत्नागिरी-४१५६१२” असा नमूद आहे. हा पत्ता बाळ माने यांच्या निवासस्थानाचा आहे हे सर्वश्रुत होय. या लिज अॅग्रीमेंटनुसार महाराष्ट्र सागरी महामंडळाची मिऱ्या येथील जागा ‘लिज’वर घेण्यात आली.

हा खटाटोप कशासाठी ? – श्री. दिनेश सावंत यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना पुढे सांगितले की, मिऱ्या येथील या जागेत स्वतःचे बंदर सुरु करण्याचा त्यांचा मानस असावा. त्यासाठीच या सर्व खटपटी करण्यात आल्या होत्या हे स्पष्ट होय. दरम्यान मिऱ्या येथे एमआयडीसीचा प्रकल्प जाहीर झाला आणि तेथे इंटरनॅशनल पोर्ट व लॉजिस्टीक पार्क होणार असे जाहीर झाले.

नको नको त्या वावड्या! – असे काही झाले तर मग आपल्या बंदराचे काय होणार? अशी चिंता बहुधा निर्माण झाली असावी आणि मग एमआयडीसीचा प्रकल्प रद्द होण्यासाठी काहीबाही वावड्या उठविण्यात आल्या व मिऱ्या ग्रामस्थांचा गैरसमज करुन दिला गेला. मिऱ्या ग्रामस्थांची जमीन जाणार, देवस्थाने उठणार, मिऱ्यावासीयांची घरे जणार, देवाचा मार्ग बंद होणार अशा वावड्या उठविल्या गेल्या असे त्यांनी सांगितले.

कुणाचे ओझे ? – श्री. दिनेश सावंत यांनी पुढे सांगितले, साहजिकच ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आंदोलन केले व त्याची दखल उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतली. जनभावनेचा आदर ठेवून एमाआयडीसीचा प्रकल्प रद्द करण्यात आला… म्हणजे ‘कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर?’ असा प्रकार घडला.

हे ‘पाप’ नव्हे का? – श्री. दिनेश सावंत हे सडेतोडपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, असे असेल तर स्वतःच्या टिचभर मतलबासाठी गावात येणारा मोठा विकास प्रकल्प घालवून लावण्याचे ‘पाप’ करण्यात आले हे खरे का? असा सवाल निर्माण होतो. याबाबत ‘नेमकी वस्तुस्थिती’ काय? हे श्री. बाळ माने यांनी जनतेसमोर येवून स्पष्ट केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

बाळ माने, हे काय? – श्री. दिनेश सावंत विलक्षण तडफ `ने बोलत होते. त्यांनी सांगितले, स्वतःच्या ‘टिचभर’ मतलबासाठी गावाचा होणारा भरभक्कम विकास ठोकरुन लावायचा हे योग्य आहे का? श्री. बाळ माने यांनी जनतेसमोर येवून याबाबत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली.

मान्यवरांची उपस्थिती – सोम.दि. १८ नोव्हें. रोजी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेला सडामिऱ्या ग्रा. पं. चे माजी सरपंच श्री. दिनेश सावंत, सडामिऱ्या सरपंच अर्पिता सावंत, ग्रा. पं. सदस्या शिल्पा पवार, श्री. निशांत सावंत, श्री. भैय्या भाटकर, खंडाळा येथील ट्रक मालक श्री. नंदकुमार बेंद्रे, जयगड येथील ट्रक मालक श्री. शराफत गडबडे, जयगड मच्छिमार सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. सलीम मिरकर, जयगड पर्सनेटचे चेअरमन श्री. तरबेज सोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular