25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द १३१ गुन्हे नोंद११० आरोपींना अटक :...

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द १३१ गुन्हे नोंद११० आरोपींना अटक : १ कोटी ३० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि.16: (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण १३१ गुन्हे नोंद केले असून ११० आरोपीत अटक केली आहे. हातभट्टीची गावठी दारु ३३४९ लिटर, देशी मद्य ६६.४२ बल्क लिटर, विदेशी मद्य ८२.२६ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९७९५.९७ बल्क लिटर, रसायन ४१५०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या दोन वाहनांसह एकूण रुपये १ कोटी ३० लाख ८३ हजार ९५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात दि. १५ ऑक्टोबर रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील/बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

माहे जानेवारी, २०२४ पासून अद्यापपर्यंत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार एकूण २८ प्रकरणात रुपये १६ लाख एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारुधंद्यात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील.

जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक-८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी /खबर देणाऱ्या व्यक्तिचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular