26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraप्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींवर बंदी

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींवर बंदी

गणेशोत्सव १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठ फुल्ल झाल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंनी दुकाने गजबजली आहेत. अगदी गणपतीच्या शाडूच्या सुबक मुर्त्यांपासून ते डेकोरेशनच्या बारीक सारीक साहित्यापर्यंत सर्वच. पण या सर्वांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्त्या पर्यावरणाला हानिकारक असल्याच्या कारणावरून केंद्र तसेच राज्य सरकारने पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. याच अंतर्गत नागपूर महापालिकेने देखील पीओपीच्या मूर्तीची विक्री,  साठवणूक करण्यास बंदी घातली आहे.

प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीवरील बंदीविरुद्ध विनोदकुमार गुप्ता आणि श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर आणि अमरावतीमध्ये पीओपी मूर्तिकारांची संख्या हजारोंच्या घरात आहे. गेल्या साठ ते सत्तर वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्तीचे उत्पादन करण्यात येत आहे. त्यामुळे अचानक अशी बंदी न लादता, निदान मूर्तिकारांकडे असलेल्या साठ्याची विक्री करू द्यावी, अशी विनंती याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनांमध्ये याचिकाकर्त्यांनी असा दावा केला आहे कि, पीओपीच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण घडून येत नसून,  पीओपीचे रासायनिक गुणधर्म पाहता पाण्यातील मासे किंवा इतर जीवांसाठीही कोणताही धोका उत्पन्न होत नाही. गणपती विसर्जन प्रसंगी जलाशयांमध्ये टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यामुळे पक्षी ते खातात त्यामुळे प्रदूषण होते. नागपूर शहरामधील सुमारे ९० ते ९५ टक्के मूर्ती या पीओपीच्याच असल्याने सुमारे साडे तीन लाख मूर्ती दरवर्षी घडवल्या जातात. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणल्यास फार मोठ्या प्रमाणावर लोकांना मूर्ती उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे हायकोर्टाने बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular