23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeLifestyleवर्क फ्रॉम होममुळे अनेक आजारांना निमंत्रण

वर्क फ्रॉम होममुळे अनेक आजारांना निमंत्रण

मागील वर्षी देशावर उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक संकटे निर्माण झाली आहेत. कोरोना साथीच्या सुरुवातीपासून अनेकांना वाहतुकीची साधने बंद झाल्याने आणि खाजगी अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. सुरुवातील येण्याजाण्यासाठी लागणारा वेळ वाचला म्हणून सर्वाना हि पद्धत बरी वाटली, प्रवासात होणारी दगदग त्यामुळे घरी राहून आपलं ऑफिसचे काम करणे हि संकल्पना छान वाटली.

परंतु, वर्क फ्रॉम होममुळे शारीरिक हालचाल मंदावली असून, शरीराला एक प्रकारचे जडत्व प्राप्त झाले आहे. घरूनच कामाच्या या पद्धतीमुळे अनेक जण मिळणाऱ्या नैसर्गिक सूर्यप्रकाशापासून लांब झाले आहेत. सतत मोबाईल किंवा कॉम्पुटरसमोर बसून नजर स्क्रीनवर राहिल्याने अनेक शारीरिक व्याधिना आमंत्रण दिल्याप्रमाणे अस्वथ झाली आहे. अनेकांना’ जीवनसत्त्वाच्या अभावाची समस्या देखील जाणवू लागली आहे.

लॉकडाउन आणि  वर्क फ्रॉम होममुळे सातत्याने घरातच बसावे लागल्याने अनेकांना ‘ ड ‘ जीवनसत्त्वची कमतरता जाणवू लागली आहे.  त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम करताना ऑफिससारखे अनेक जण टेबल खुर्चीवर न बसता पलंगावर झोपून किंवा त्यावर लॅपटॉप ठेवून काम करतात. कामाच्या या चुकीच्या सवयींमुळे पाठीचे, मानेचे दुखणे वाढत असून मणक्याचे आजार बळावतत आहेत , असे निरीक्षण अस्थिरोगतज्ज्ञ यांनी सांगितले.

त्वचेवर सूर्यकिरण पडल्याने ‘ ड ‘ जीवनसत्व तयार होते. पण, नैसर्गिक सूर्यप्रकाशच शरीराला न मिळाल्याने ‘ ड ‘ जीवनसत्त्वाचा प्रचंड अभाव दिसून येत असून, हाडांमध्ये कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ बनत चालली आहेत. त्यामुळे अस्थिरोगतज्ज्ञनी सुद्धा असाच सल्ला दिला आहे कि, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांन सूर्यप्रकाश पुरेसा मिळण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करून जीवनशैलीमध्ये काही प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular