29.8 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पन्नास हजार लिटर सांडपाण्यावर रोज प्रक्रिया – देवरूख ग्रामीण रुग्णालय

देवरूख ग्रामीण रुग्णालयामध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात...

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriनव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

मी पुन्हा आलोच... हा देवेंद्र फडणवीस यांचा लावलेला बॅनर लक्ष्यवेधी ठरला.

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेता रत्नागिरीत भाजपाच्या एकच जल्लोष केला. रत्नागिरीतील मारुती मंदिर आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आठवडा बाजार येथील कार्यालयासम ोर एकच जल्लोष करण्यात आला. ढोलताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भाजपा कार्यकर्त्यांनी रत्नागिरी दणाणून सोडली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा सोहळा मारुती मंदिर येथे भाजपाच्या माजी नगरसेवकांनी भव्य स्क्रिनवर प्रक्षेपित केला. या सोहळ्यात ढोल- ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लाडू, मिठाई वाटप केली. रत्नागिरीकरांनी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मारुती मंदिरप्रमाणेच रत्नागिरी शहर व तालुका भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालयासम कार्यकर्त्यांनी ोरही जल्लोष करण्यात आला.

त्यानंतर ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो हाती घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेलीआळी नाक्यापर्यंत मिरवणूक काढली. मारुती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा निवडणूक समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा निवडणूक समन्वयक सचिन वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, जिल्हा चिटणीस सचिन करमरकर आणि जिल्हा चिटणीस उमेश कुळकर्णी, माजी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर, अशोक मयेकर, अॅड. विलास पाटणे, प्रवीण देसाई, पल्लवी पाटील, संपदा तळेकर यांच्यासमवेत धामणसेचे सरपंच अमर रहाटे, माजी सरपंच संदीप शिंदे, मंजिरी पाडळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, ऐश्वर्या जठार, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा कार्यालयासमोर आयोजित – कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, उमेश देसाई, मंदार मयेकर, मंदार खंडकर, वर्षा ढेकणे, दादा ढेकणे, लिलाधर भडकमकर, प्रशांत डिंगणकर, सतेज नलावडे, प्रियल जोशी, राधा हेळेकर, अमित विलणकर, निलेश आखाडे, संदीप नाचणकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा कार्यालयाबाहेरही मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात भाजपा कार्यालयापासून आठवडाबाजार तेलीआळी नाक्यापर्यंत उत्स्फुर्त रॅली काढत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. विधानसभेत मी पुन्हा येईन असे म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका केली देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. देवाभाऊच्या या विजयाचा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. संध्याकाळी ५ वाजल्यापासून मारुती मंदिर येथे ढोल-ताशांचा गजर करण्यात येत होता.

मी पुन्हा आलोच… हा देवेंद्र फडणवीस यांचा लावलेला बॅनर लक्ष्यवेधी ठरला. एकंदरित भाजपच्या जल्लोषी कार्यक्रमाचे सुरेख आयोजन करण्यात आले. हजारो. लोकांना येथे लाडू वाटप करण्यात येत होते. महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली कार्यकुशलता, नेतृत्व आणि कार्यक्षमता पूर्णपणे वापरतील. देवेंद्रजीं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून त्यांना रत्नागिरीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो,. असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular