27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriअखेर रत्नागिरीतील रस्त्यांची डागडुजी सुरु

अखेर रत्नागिरीतील रस्त्यांची डागडुजी सुरु

रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत राम आळीमध्ये रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अखेर या कामाला मुहूर्त गवसला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. परंतु, खड्ड्यातील पूर्वीची माती न काढता ठेकेदाराकडून तशेच खड्डे भरले जात आहेत. हे तेथील व्यापार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, व्यापाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध दर्शविला. रस्त्याची डागडुजी करायची असेल तर ती चांगल्याप्रकारे करा, वरचेवर आटपायचं म्हणून करू नका अशा सूचना व्यापाऱ्यांनी ठेकेदाराला केल्या आहेत.

काही काळ व्यापारी, ठेकेदार आणि कामगारांमध्ये झालेल्या शाब्दिक चर्चेमुळे काम बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम बंद पडल्याचे वृत्त कानी पडताच नगरसेवक निमेश नायर यांनी घटनास्थळी धाव घेऊन, व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ठेकेदाराला काम चांगल्याच दर्जाचे झाले पाहिजे अशा सूचना दिल्या.

रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील निर्माण झालेले भयंकर खड्डे दिवसेंदिवस नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस असेल तर रस्ता कुठे आणि खड्डे कुठे अशी संभ्रमित अवस्था निर्माण होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप  उर्फ बंड्या साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचे काम सुरू करण्यात आले. प्रमुख ११ रस्त्यांवर हे पॅचिंगचे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दोन गट बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १० दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आणि गणेश विसर्जनासाठी ज्या मार्गावरून जास्त रहदारी असते अशा रस्त्यांवरील खड्डे भरण्यास प्राधान्य दिले जात आहे. या १० प्रमुख रस्त्यांमध्ये रामनाका, गोखले नाका, तेलीआळी, बंदर रोड, धनजी नाका ते राधाकृष्ण नाका, घुडेवठार, चवंडेवठार ते मांडवी, आठवडा बाजार, गाडीतळ, परटवणे आदींचा समावेश केला गेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular