24.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriसहलींपूर्वी बस सुस्थितीत असल्याची खात्री करा - गटशिक्षणाधिकारी

सहलींपूर्वी बस सुस्थितीत असल्याची खात्री करा – गटशिक्षणाधिकारी

नेहमीच्या अभ्यासाच्या दगदगीतून शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुटका होते.

हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन तसेच खासगी वाहनांमधील बिघाडामुळे होणारे अपघात लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या चिपळूण येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सहलींसाठी बसचा वापर करताना वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तसेच बसची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना केली आहे. सध्या हिवाळ्यामुळे उत्साहाचे वातावरण असल्याने थंड हवेचा आनंद निसर्गरम्य ठिकाणी घेण्यासाठी अनेकजण सहलींचे आयोजन करत आहेत. यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाला असताना काही दिवसांपासून थंडीचा कडाकाही जाणवू लागला आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण असल्याने शैक्षणिक सहलींसाठी हा कालावधी योग्य मानला जात आहे. शैक्षणिक सहलींसाठी फारसे कोणी पुढाकार घेत नव्हते.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने शालेय स्तरावर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्यावतीने करण्यात आल्या. त्यामुळे शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुखरूप तसेच सुरक्षित होण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या विषयी गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी माहिती दिली. चिपळूण तालुक्यातील विविध शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शाळांना देण्यात येणारे वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. नादुरुस्त व सुस्थितीत नसलेली सहलीसाठी वाहने देण्यात येऊ नयेत, सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसवरील निर्व्यसनी चालक असावा, आदी सूचना इरनाक यांनी केल्या आहेत.

शाळांची अनुत्सुकता – शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात विद्यार्थ्यांची काळजी हा संवेदनशील मुद्दा असल्याने अनेक शाळा अनुत्सुक असतात. नेहमीच्या अभ्यासाच्या दगदगीतून शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुटका होते. त्यांना वेगळ्या विश्वात नवीन काहीतरी अनुभवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून काही शाळा शैक्षणिक सहलींसाठी आग्रही असतात. अशा सहलींचे आयोजन करताना राज्य परिवहनची साथ महत्त्वाची असते.

RELATED ARTICLES

Most Popular