26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriलांज्यातील पाणी योजना मार्चपूर्वी पूर्ण करा - किरण सामंत

लांज्यातील पाणी योजना मार्चपूर्वी पूर्ण करा – किरण सामंत

नागरिकांचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा.

लांजा तालुक्यातील पाणी योजनांची ५८ कामे पूर्ण झाली असून, ६२ कामे प्रगतीपथावर आहेत; मात्र ही सर्व कामे कोणतीही सबब न देता ३१ मार्चपूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. तालुक्यातील पाणीप्रश्नांबरोबरच सर्व विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी सर्व ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत आमदार सामंत यांनी ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा. हरकती, निधीची उपलब्धता, जागेची कमतरता किंवा अन्य वेठीस धरणाऱ्या क्षुल्लक कारणांमुळे कामे थांबवू नका. कामे मंजूर करण्याचे काम माझे, कामे पूर्णत्वाला नेण्याचे काम तुमचे आहे, असे खडेबोल सामंत यांनी सुनावले. लांजा पंचायत समिती पाणीटंचाई कृती आराखडा बैठक संकल्प सिद्दी हॉल येथे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा उपअभियंता एल. एस. करंडे उपस्थित होते. आमदार किरण सामंत म्हणाले, जी कामे प्रस्तावित आहेत त्यांना लवकरच मंजुरी देण्यात येईल; मात्र अर्धवट सुरू असलेली कामे गतीने सुरू करा. ग्रामसेवक, तलाठी, उपअभियंता यांचे मार्गदर्शन घ्या. स्थानिक जनतेला वेठीस धरू नका. दुर्गम भागातील गाव आणि तेथील वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. काही वर्षांचा आढावा पाहता पाणीटंचाईचे प्रमाण कमी झाले आहे. टंचाईग्रस्त ७ गावे आणि ११ वाड्या आहेत. त्या ठिकाणी जलस्रोत कमी असल्याने त्या ठिकाणी उपाययोजनेच्यादृष्टीने प्रयत्न असणार आहेत. दुर्गम भागात असलेल्या व टंचाईग्रस्त गावांमधील कामे जलदगतीने मार्गी लावा. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर प्राधान्य द्या.

दोनशेहून अधिक बंधारे – गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी २०२३-२४ चा पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेतला. नळपाणी योजना, विंधन विहिरी, गाळ उपसा ही कामे काही ठिकाणी झाली असून, काही ठिकाणी सुरू आहेत; मात्र काही वर्षांच्या तुलनेत तालुक्यामध्ये पाणीटंचाईचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. तालुक्यात दोनशेहून जास्त बंधारे बांधण्यात आल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular