26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeSindhudurgमौज-मस्ती आणि नाच-गाण्यांमध्ये घालवली रात्र ! आचऱ्याची गावपळण

मौज-मस्ती आणि नाच-गाण्यांमध्ये घालवली रात्र ! आचऱ्याची गावपळण

गावपळण ही आचरे गावची रूढी परंपरा न राहता इतरांसाठी इव्हेंट ठरल्याचे दिसत आहे.

घर दार आणि गाव सोडून निसर्गाच्या सानिध्यात मस्त जगायचे… ना कसले टेन्शन ना कसली कटकट… फक्त मौज मजा आणि मस्ती करायची… खाण्या पिण्याची चंगळ, चिकन मटणावर ताव मारायचा… खेळ, गाणी, नाच आणि गप्पा टप्पा… असेच जीवन सध्या आचरेवासीय साऱ्या जगाशी बेफिकीर होऊन गावपळणीच्या निमित्ताने जगत आहेत. गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर राहूट्यांमध्ये संसार थाटलेल्या आचरेवासीयांनी कालची रविवारची रात्र जमिनीच्या अंथरुणावर आणि आकाशाच्या पांघरूणाखाली हसत खेळत घालवत गावपळणीचा आनंद लुटला. आचरा गावच्या गावपळणीला काल रविवारी दुपारपासून सुरू झाली. आचरे ग्रामस्थ गाववेशीबाहेर झोपड्या बांधून तीन दिवसासाठी वास्तव्यास राहिले आहेत. जीवनावश्यक साहित्याबरोबरच कुत्रे, मांजरे, गुरे, कोंबड्या आदी पाळीव प्राणीही ग्रामस्थानी आपल्यासोबत आणत त्यांचीही खास व्यवस्था केली आहे.

रविवारची गावपळणीची पहिली रात्र सर्वांना आनंदाची ठरली. ग्रामस्थांनी चिकन, मटण व माशाच्या जेवणाचा बेत आखत जेवणावर ताव मारला. त्यानंतर करमणूकीसाठी ग्रामस्थानी विविध कार्यक्रम करत आनंद लुटला. टाळ मृदूंगाच्या तालावर भजने म्हणत ग्रामस्थ भजनात दंग झाले. नृत्याबरोबरच गोमू नृत्यानेही रंगत आणली होती. केवळ युवाईच या आनंदात सहभागी झाली नाही तर महिला व वयोवृद्ध महिलांनीही फेर धरला. बच्चे कंपनीही आपले खेळ खेळत या गावपळणीत रमली आहेत. तसेच बच्चे कंपनी व युवकांनी सकाळी खाडीपात्रात डुंबत स्नानाचा आनंद लुटला.

गावपळण जाणून घेण्यासाठी झाली गर्दी – गावपळणीची ही अनोखी प्रथा जाणून घेण्यासाठी व अनुभवण्यासाठी अनेक युट्युबर्स तसेच अभ्यासक या ग्रामस्थांच्या वस्तीला भेट देऊन माहिती घेत आहेत. यामुळे गावपळण ही आचरे गावची रूढी परंपरा न राहता इतरांसाठी इव्हेंट ठरल्याचे दिसत आहे. येणारे लोक या प्रथेबद्दल कुतूहल व्यक्त करत असून गावपळण म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी रविवारी वेशी बाहेरील वस्तीत गर्दी झाली होती. आचरा काझीवाडी येथील राजू मुजावर यांनी आमचा आचरा गाव सर्व धर्मसमभावाचे प्रतिक आहे, त्यामुळे या प्रथेत आम्हीही सहभागी होतो, असे सांगितले.

गावपळणीतही होतोय पाहुणचार – आचरा गावपळणीत वेशीबाहेर राहिलेल्या ग्रामस्थांचे राहणीमान अनुभवण्यासाठी येणाऱ्या लोकांना प्रसारमाध्यम प्रतिनिधिंना येथिल ग्रामस्थ राहुट्यात राहत असले तरी आग्रहाने चहापाण्यापासून अगदी जेवणा पर्यंत आग्रह करत आहेत. प्रेमाने होणारी सरबराई गावपळणीतील वेगळेपण दाखवत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular