26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूण बसस्थानकासाठी उपाययोजना करा - आमदार शेखर निकम

चिपळूण बसस्थानकासाठी उपाययोजना करा – आमदार शेखर निकम

चिपळूण बसस्थानकाचा प्रस्ताव सहा वर्षे रखडलेला आहे.

चिपळूण येथील हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या ६ वर्षांपासून सुरूच आहे. मे २०१८ मध्ये सुरू झालेल्या बसस्थानकाचे बांधकाम सध्या स्लॅबपर्यंत पोहोचले आहे. या रखडलेल्या कामामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना हलाखीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागतो. त्यामुळे हे बसस्थानकाचे काम मार्गी लागण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात केली. चिपळूण शहरातील रखडेलल्या बससस्थानकाचा मुद्दा मांडताना आमदार शेखर निकम म्हणाले, सध्या बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालवला जात असून, त्या ठिकाणी उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही. स्वच्छता, पेयजल व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असून प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

चिपळूण बसस्थानक नूतनीकरणाचा प्रकल्प ६ वर्षांपासून रखडलेला आहे. चिपळूण व संगमेश्वर आगारात बसेसची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाने ठोस उपाय योजना राबवण्याची आवश्यकता आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बसस्थानकाचा नूतनीकरण प्रकल्प त्वरित पूर्ण करावा आणि ग्रामीण भागासाठी आवश्यक बसेस उपलब्ध करून प्रवाशांना दिलासा द्यावा. यामुळे जनतेचा शासनावरचा विश्वास वाढेल आणि मतदार संघातील विकासाला चालना मिळेल, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

प्रस्ताव सहा वर्षे रखडला – चिपळूण बसस्थानकाचा प्रस्ताव सहा वर्षे रखडलेला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. सध्याचे बसस्थान म्हणजे केवळ एक पत्र्याचे शेड आहे. प्रवाशा, सबसची प्रतीक्षा करताना धड उभेही राहण्यास पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर येथील स्वच्छता, पेयजल, अन्य मूलभूत सुविधांचा आभाव आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला प्रवासी प्राधान्य देतील. यामाध्यमातून एसटीचे उत्पन्नही वाढेल.

RELATED ARTICLES

Most Popular