26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeSindhudurg'वंदे भारत' मार्ग बदलते तेव्हा, रेल्वे प्रशासनात खळबळ

‘वंदे भारत’ मार्ग बदलते तेव्हा, रेल्वे प्रशासनात खळबळ

या चुकीमुळे मुंबईच्या मध्य रेल्वेसह मध्य रेल्वेवरील लोकल सेवासुध्दा विस्कळीत झाली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून (सीएसएमटी) गोव्याच्या मडगाव स्थानकादरम्यान धावणारी भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदेभारत एक्स्प्रेस चक्क मार्ग बदलून कल्याण स्थानकावर पोहोचली. सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार सोमवारी (ता. २३) सकाळी घडला. प्रवाशांना मात्र जास्त वेळ ताटकळत राहावे लागले. वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मडगावच्या दिशेनी निघाली; मात्र मुंबईतच मार्ग बदलला गेला. काही काळ गाडी दिवा स्थानकावर थांबली होती. बाजूला जनशताब्दीही थांबली होती; मात्र मडगावकडे निघालेली ही गाडी कल्याणला पोहोचल्याचे समोर आले. सीएसएमटीपासून मडगाव स्थानकादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालविली जाते. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम थांबे आहेत; मात्र ठाण्यामध्ये ही गाडी मार्ग बदलून दिवा स्थानकावरून पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने पुढे गेली.

हा प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाचाही गोंधळ उडाला. त्यानंतर वंदे भारतला कल्याण स्थानकात आणण्यात आले. पुढे काही वेळाने ती पुन्हा एकदा गोव्याच्या दिशेने रवाना झाली. मार्ग चुकल्यामुळे रेल्वेला मडगाव स्थानकावर पोहोचण्यासाठी तब्बल ९० मिनिटे उशीर झाला. दिवा जंक्शनच्या डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनमध्ये असलेल्या एका सिग्नलमध्ये आणि दूरसंचार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. या चुकीमुळे मुंबईच्या मध्य रेल्वेसह मध्य रेल्वेवरील लोकल सेवासुध्दा विस्कळीत झाली. याचा चांगलाच फटका चाकरमान्यांना बसला. मार्ग चुकल्याचे लक्षात येताच या रेल्वेला कल्याणला आणले गेले आणि नंतर पुन्हा एकदा मार्गस्थ करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular