26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriगुन्ह्यातील अमली पदार्थ जाळून नष्ट, तळोजात कारवाई

गुन्ह्यातील अमली पदार्थ जाळून नष्ट, तळोजात कारवाई

१०.०३३ किलोग्रॅम गांजा व ३.९८ किलोग्रॅम केटामाईन असा मुद्देमाल जाळून नष्ट केला.

जिल्ह्यामध्ये १२ विविध गुन्ह्यांतील गांजा, केटामाईन असा मुद्देमाल सुरक्षितपणे तळोजा (नवी मुंबई) या ठिकाणी घेऊन जाऊन जाळून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आला. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई, यांनी एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल नाश करण्यासाठी सर्व पोलिस अधीक्षक यांना आदेश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या डिस्पोजल समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे असून या समितीच्या सदस्या या अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व राधिका फडके, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) हे आहेत. जिल्ह्यातील एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत आदेश पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २००६ ते २०२० या कालावधीत गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले. त्याप्रमाणे नमूद गुन्ह्यातील एनडीपीएस मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आलेला होता. प्रदूषण नियंत्रण विभागाकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल हा नवी मुंबई येथे नाश करण्यासाठी मंजुरी दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने २७ डिसेंबरला जिल्ह्यामध्ये एकूण दाखल १२ विविध गुन्ह्यांतील १०.०३३ किलोग्रॅम गांजा व ३.९८ किलोग्रॅम केटामाईन असा मुद्देमाल सुरक्षितपणे तळोजा येते घेऊन जाऊन जाळून नष्ट केला.

RELATED ARTICLES

Most Popular