26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...

‘राजीवडा संस्थे’ची ‘मत्स्य’ला नोटीस, कारवाईत बांधकाम जमीनदोस्त

मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणविरोधी कारवाईत राजीवडा महिला मच्छीमार...
HomeSportsनितीश कुमार भारताचा नवा हीरो, शतक करत टीम इंडियाची लाज राखली

नितीश कुमार भारताचा नवा हीरो, शतक करत टीम इंडियाची लाज राखली

भारताने तिसऱ्या दिवसअखेर नऊ बाद ३५८ अशी मजल मारली.

विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याभोवती प्रामुख्याने भारतीय क्रिकेटने फेर धरलेला असताना आणि हाच भारतीय संघ मोठा अडचणीत असताना आंध्र प्रदेशचा २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डी नवा हीरो ठरला. जिगरबाद आणि संस्मरणीय नाबाद शतकी खेळी करत ८० हजार प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामुळे संकटात सापडलेल्या भारताने तिसऱ्या दिवसअखेर नऊ बाद ३५८ अशी मजल मारली. गावसकर-बॉर्डर करंडक कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवस नितीश कुमार या युवकाने गाजवला. आक्रमक फलंदाजी हे मुख्य अंग असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये आवश्यक असलेली जिद्द, चिकाटी आणि संयम त्याने दाखवला. समोर अनुभवी फलंदाज बाद होत असताना नितीश कुमार जिद्दीने लढला. दिवसाचा खेळ संपता संपता जबरदस्त शतक केले (नाबाद १०५), त्यामुळे पाच बाद १५९ आणि सात बाद २२१ अशा गटांगळ्या खाणाऱ्या भारताला दिवसअखेर साडेतीनशे (३५८) धावांचा टप्पा गाठता आला.

तरीही भारतीय संघ अजून ११६ धावांनी पिछाडीवर आहे. नितीश कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर (५०) या दोघांनी आठव्या विकेटसाठी केलेली १२१ धावांची भागीदारी तेवढीच मोलाची ठरली. भारताच्या या पहिल्या डावातील ही सर्वाधिक धावांची. भागीदारी ठरली. तिसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीला जडेजा आणि रिषभ पंतने समजस खेळ केला. एक-दोन वेळा नको त्या चोरट्या धावा पळायचा त्यांनी केलेला प्रयत्न चाहत्यांच्या पोटात गोळा आणणारा होता. ऑस्ट्रेलिया गोलंदाज थोडे अस्वस्थ व्हायला लागले असताना रिषभ पंतने हाराकिरी केली. २८ धावा काढून चांगली फलंदाजी जमत असताना पंतने अत्यंत खराब फटका मारताना आपली विकेट स्कॉट बोलंडला बहाल केली. नॅथन लायनला कारण नसताना मागे सरकून फलंदाजी करताना जडेजा दोनदा पायचीत होताना वाचला होता.

त्या चुकीतून त्याने बोध घेतला नाही. परत एकदा मागे सरकत खेळताना तो लायनलाच पायचीत झाला. सात बाद २२१ धावसंख्येवर भारताचा डाव लवकर गुंडाळला जाणार वाटत असताना नितीश कुमार रेड्डीला वॉशिंग्टन सुंदर येऊन मिळाला. नितीश कुमारचे वेगवान गोलंदाजांना धैर्यान तोंड दिले. उसळत्या चेंडूंना खेळायचे त्याचे तंत्र चांगले होते. तो चेंडूवरची नजर हटवत नव्हता. संधी मिळता खराब चेंडूंना नितीश ताकदीने फटके मारत होता. मेलबर्नची खेळपट्टी फलंदाजीला साजेशी असल्याचे नितीश-सुंदरने दाखवून दिले.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया, पहिला डाव : ४७४. भारत, पहिला डाव : ११६ षटकांत ९ बाद ३५८ (यशस्वी जयस्वाल ८२, रोहित शर्मा ३, केएल राहुल २४, विराट कोहली ३६, रिषभ पंत २८, रवींद्र जडेजा १७, नितीश कुमार रेड्डी खेळत आहे १०५ – १७६ चेंडू, १० चौकार, १ षटकार, वॉशिंग्टन सुंदर ५० – १६२ चेंडू, १ चौकार, कमिंस २७-६-८६-३, बोलंड २७-७-५७-३, लायन २७-४९८८-२)

असे पूर्ण झाले शतक – खेळ चालू झाल्यावर अर्धशतक करून वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने परत एकदा शांतपणे खेळ करून शतकी मजल मारली. तो ९९ धावांवर असताना सुंदर आणि बुमरा पाठोपाठ बाद झाले. सिराजने मोलाचे चेंडू खेळून काढल्यावर नितीशने बोलंडला सरळ बॅटचा खणखणीत चौकार मारून कसोटी क्रिकेटमधले आपले पहिले शतक १० चौकार एका षटकारासह पूर्ण केले आणि सगळ्या प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले.

पुष्पा ते बाहुबलीच्या पोझ – नाबाद १०५ धावा करून प्रेक्षकांची मने जिंकणारा व भारतीय संघाच्या मदतीस धावून आलेला नितीश कुमार रेड्डी चांगलाच चमकला. त्याने अर्धशतक केल्यावर पुष्पा सिनेमातील अॅक्शन (झुकेगा नही…) करून आनंद साजरा केला. तर, शतक झाल्यावर बाहुबलीसारखी पोझ दिली. त्याचा अफलातून खेळ बघायला त्याचे माता-पिता व बहीण मेलबर्न क्रिकेट मैदानावर हजर होते. तो खेळत असताना बाद व्हावा म्हणून उगाच आवाज देणारे ऑसी खट्याळ प्रेक्षक त्याच्या शतकानंतर उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. त्याचा खेळ व सेलिब्रेशन अजब असे लोकांनी त्याच्या या खेळीचे कौतुकाने वर्णन केले.

RELATED ARTICLES

Most Popular