25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeDapoliदापोलीतील घटना सिलिंडर स्फोटात दांपत्य गंभीर जखमी

दापोलीतील घटना सिलिंडर स्फोटात दांपत्य गंभीर जखमी

गॅस लिक झाल्यामुळे स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तालुक्यातील रूपनगर येथील एका सदनिकेत झालेल्या सिलिंडर स्फोटात पती- पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविले आहे. हा प्रकार घडला तेव्हा त्यांची मुले शाळेत गेलेली होती. या घटनेत घराचे पूर्ण नुकसान झालेले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अविनाश शिर्के आणि अश्विनी शिर्के या दोघांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिर्के कुटुंबीय गेले काही महिने रूपनगर येथील सदनिकेत राहत आहेत. अविनाश हे एका एजन्सीत कामाला आहेत. शुक्रवारी दुपारी शिर्के यांच्या घरातील सिलिंडरने अचानक पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरातील प्रापंचिक साहित्याची राखरांगोळी झालेली होती. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाचा आवाज आणि घरात लागलेली आग यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

शिर्के यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा आणि त्याच्या बाजूची भिंत समोर राहणाऱ्या माने यांच्या दरवाजावर पडली. तसेच शेजारील जाधव यांच्या घरालाही स्फोटाचा हादरा बसला. त्यांच्या घरातील भांडी खाली पडली. दुपारची वेळ असल्यामुळे घरी केवळ पती-पत्नीच होते. सुदैवाने त्यांची दोन मुले शाळेत गेलेली होती. या दुर्घटनेत त्यांच्या घरातील साहित्य तसेच घरगुती वापराच्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. स्फोट इतका शक्तिशाली होता, की त्यांच्या घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून पडले. त्यामुळे सदनिकेखाली उभ्या असलेल्या चारचाकीचेही नुकसान झाले आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अविनाश शिर्के व अश्विनी शिर्के यांना प्राथमिक उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, गॅस लिक झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular