26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...

‘राजीवडा संस्थे’ची ‘मत्स्य’ला नोटीस, कारवाईत बांधकाम जमीनदोस्त

मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणविरोधी कारवाईत राजीवडा महिला मच्छीमार...
HomeChiplunसर्वांच्या मेहनतीमुळेच आपण साऱ्यांनी ही निवडणूक जिंकली: आ. शेखर निकम

सर्वांच्या मेहनतीमुळेच आपण साऱ्यांनी ही निवडणूक जिंकली: आ. शेखर निकम

या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

निवडणूकीत काय झाले, कशामुळे मताधिक्य इथे मिळाले नाही… कुणी कशाचा वापर केला… या पेक्षा आपल्या काय चुका झाल्या… आपण कुठे कमी पडलो हे शोधणे आवश्यक आहे… आपल्याला पॉझिटिव्ह विचाराने काम करण्याची गरज आहे… दुसऱ्यांना दोष देऊन चालणार नाही… या पुढे जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. शेखर निकम यांनी स्पष्ट करून सर्वांच्या मेहनतीमुळेच ही निवडणूक आपण साऱ्यांनी जिंकल्याचे हे त्यानी स्पष्ठ केले. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या आ. शेखर निकम याचा महायुतीच्या वतीने शनिवारी भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी म ाजी आमदार भाजपचे नेते डॉ विनय नातू आणि राष्ट्रवादीचे जिल्हाधक्ष बाबाजीराव जाधव याच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. आ. शेखर निकम यांनी सर्वप्रथम महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये असणारा समन्वय या मुळेच विजयाचे यश मिळाल्याचे आ. शेखर निकम यांनी स्पष्ट करून छोट्या छोट्या कार्यकर्त्यानी आणि माझ्या बहिणींनी चागले काम केल्याचे आ. निकम यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.

शहराचा वाटा मोठा! – निवडणुकीत धनश्रीचा मोठ्या प्रम ाणात वापर झाल्याचे म्हणणे अनेकांनी आपल्या भाषणात मांडले होते, हाच धागा पकडत आ. निकम म्हणाले की हे वापरले म्हणून असे घडले आणि ते वापरले म्हणून असे झाले असं म्हणणं मुळात चुकीचं आहे. आपण आपले काम करीत असताना चागल्या बाबी घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे. निवडणुकीत प्रत्येक वेळी वातावरण बदलत असते. त्या साठी आपण आपल्या बाबी लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मला बाराशे मते कमी पडली, त्याला वेगळे कारण आहे. गत वेळेला आठ हजार मते याच शहराने दिली होती. आपण विकासकामे केली. मात्र माझ्या बद्दल जनतेत जो गैरसमज पसरवण्याचे काम झाले त्या मुळेच ही मते घटली असल्याचे आ. निकम यांनी सांगून आता ही शहराचा विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले.

शहर विकसासाठी बैठक। – मी राजकारण करीत बसणारा नव्हे. कुठे मते मिळाली आणि कुठे नाहीत याचा विचार न करता आपण आपले काम करीत रहायचे. शहराच्या विकासासाठी लवकरच बैठक आपण घेणार आहोत. शहरात काय केले पाहिजे लोकांचे काय प्रश्न आहेत हे जाणून आपण काम करायचे आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन चिपळूण शहर विकासात नावारूपाला आणण्याचे आवाहन आ. निकम यांनी केले. मला श्रेय घेण्यात आनंद वाटत नाही. श्रेय घेण्यापेक्षा प्रथम आपण काम करू. केलेल्या कामाचे आपोआप श्रेय मिळत असते. कोणीही कितीही म्हटले तरी प्रत्येकाला एक मन आहे आणि ते मन खोटे बोलत नाही, असे आ शेखर निकम यांनी यावेळी स्पष्ठ केले.

महायुती भक्कम राखुया ! – या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. शिवसेना शिंदे गट ही आघाडीवर होता. सर्वांनी एक दिलाने काम केले म्हणूनच आज आपल्या मेहनीतचे फळ विजयाच्या रुपात मिळाले असल्याचे आ. निकम यांनी सांगून अशीच भक्कम महायुती. आपल्याला ठिकावायची असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत एकसंघ राहण्याचे आवाहन आ निकम यांनी केले. आता महायुतीच्या कार्यकर्त्याचा अधिकार माझ्यावर आहे. कारण तुमच्यामुळेच आमदारकी असून ती आमदारकी तुमची आहे, असे आ. शेखर निकम यांनी स्पष्ठ करताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.

आतापासून कामाला लागा – कार्यकर्त्याना ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी आतापासून कामाला लागा. मात्र प्रत्येकाने दोन पावले मागे जाण्याची तयारी सुद्धा ठेवावी. सर्वानाच न्याय देणे कधी कधी शक्य नसते. निवडणूक जिकायचीच आहे याचं उद्देशाने आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन आ निकम यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular