26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriबांगलादेशीला रत्नागिरीतील जन्म दाखला तत्कालीन सरपंच

बांगलादेशीला रत्नागिरीतील जन्म दाखला तत्कालीन सरपंच

जन्मदाखला दिल्या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकाची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चौकशी केली.

बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरीतील जन्मदाखला दिल्याप्रकरणी रत्नागिरीतील प्रसिध्द शिरगांव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह तत्कालिन प्रभारी सरपंच आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असून तात्काळ हा चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी शिरगांव ग्रामपंचायतीचे तत्कालीन प्रभारी सरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांना मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी पाचारण केल्याचे वृत्त आहे. रत्नागिरीतील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी शिरगाव ग्रामपंचायतून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरून ही बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी जन्मदाखला देणाऱ्या तात्कालीन प्रभारी सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

मुंबईत पकडले – मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव असल्याची माहिती पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आली. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ रत्नागिरीतील शिरगांव ग्रामपंचायतीने दिलेला जन्मदाखला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्याच्या जन्मदाखल्यावर जन्म १ मे १९८३ रोजी उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि रत्नागिरी येथे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्मदाखला तयार केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

तपास सीआयडीकडे – रत्नागिरीतील श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असणाऱ्या शिरगांव ग्रामपंचायतीतून अशाप्रकारे बोगस दाखला एका बांगलादेशी व्यक्तीला दिला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई सीआयडी करत असून दिलेल्या दाखल्याची पडताळणी केली असता हा दाखला खोटा असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत समोर आले आहे.

बिडिओंना आदेश – तत्कालिन ग्रामसेवक यांची पदोन्नती होऊन ते सध्या जिल्ह्यात अन्यत्र विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामसेवकाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली चौकशी : बांगलादेशी नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला दिल्या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकाची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चौकशी केली. ग्रामपंचायतीचे संपुर्ण रजिस्टर तपासण्यात आले. कोरोना काळामध्ये मे २०२० मध्येहा जन्मदाखला दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे चौकशीनंतर संबंधितांवर

RELATED ARTICLES

Most Popular