29.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriसुवर्णदुर्गला वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी हालचाली सुरू जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

सुवर्णदुर्गला वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी हालचाली सुरू जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी केली होती.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेला सुवर्णदुर्ग किल्ला (ता. दापोली) वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्याच्या हालाचालींना वेग आला आहे. युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) नुकतीच या जलदुर्गाची पाहणी केली होती. त्यानुसार लागणाऱ्या सोयीसुविधा, बेकायदेशीर बांधकामे हटवणे, पाणी, टॉयलेट, पार्किंग आदीच्या अॅक्शन प्लॅनच्यादृष्टीने काल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या सुविधा पुर्ण झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. जिल्हाधिकारी श्री. सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हौं आणि ङ्गकिल्ल्याच्या परिसरामध्ये काय सुविधा देता येतील याची पाहणी केली. दापोली शहरापासून हर्णे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा उपलब्ध आहे.

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. भारत सरकारने या किल्ल्याला २१ जून, इ.स. १९१० ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या जलदुर्गाचे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्याचा इतिहास आहे. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला वल्ड हेरिटेज साईड दर्जा देण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी केली होती.

त्या पाहणीनंतर ‘त्यांनी काही सुधारणा आणि सुविधा सुचविल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिल्यानंतर प्रशासनाने त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्यादृष्टीने काल हर्णे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. युनेस्कोला दिलेल्या शब्दानुसार तेथील बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात येणार आहेत, पर्यटकांना पार्किंग, पाण्याची सविधा, टॉयलेट, आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. युनेक्सोच्या सुधाराणांप्रमाणे काम झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक पातळीवर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular