26.3 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeInternationalतालिबान्यांनी जारी केला एक अजब फतवा

तालिबान्यांनी जारी केला एक अजब फतवा

अफगाणिस्तानात तालिबान्याची सत्ता स्थापित झाल्यापासून, तालिबानी बुरसटलेले कायदे राबवायला तिथे सुरुवात झाली आहे. सुधारणावादी विचारांचा दावा करणा-या तालिबान्यांनी आपली लोकशाहीला दडपून टाकणाऱ्या रिती परंपरा लादायला सुरुवात केली आहे. महिलांना हीन दर्जाचे समजणाऱ्या, तसेच आम्ही कुणाच्याही हक्कावर गदा आणणार नाही असे म्हणणाऱ्या तालिबान्यांनी एक अजब फतवा जारी केला आहे. महिलांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राखू असं म्हणणा-या तालिबाननं यापुढे अफगाणिस्तानमध्ये  शाळा कॉलेजांमध्ये मुला-मुलींना एकत्र शिकता येणार नाही.

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आम्ही महिलांना शिक्षणापासून रोखणार नाही, त्यांचे हक्क अबाधित राखू असं सांगणा-या तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख अब्दुल हक्कानी यांनी हा फतवा काढला आहे. स्थानिक खामा न्यूजला दिलेल्या मुलाखतीच्या रिपोर्टनुसार,  नव्या शासन प्रणालीत मुलींचा शिक्षणाचा अधिकार बाधित राहीला असला तरी, त्यांना मुलांसोबत एकत्र शिकता येणार नाही आहे. मुस्लीम कायद्यानुसार त्यांना वेगळ्या वर्गात बसून शिकाव लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना सरकारी आणि खासगी महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत असंही हक्कानी यांनी पुढे म्हंटल आहे.

परंतु, तालिबान्यांच्या या अजब फतव्यामुळे अफगाणिस्तानातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इथल्या महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींना स्वतंत्रपणे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेलं शैक्षणिक कर्मचारी आणि बैठक व्यवस्थादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे स्वाभाविकच या निर्णयांमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या संख्येमध्ये आपोआप घट होईल हे त्यांना ज्ञात आहे. धर्माच्या नावाखाली महिलांच्या शिक्षणावर रोख लावणे हा तालिबान्यांचा सुरूवाती पासूनच अजेंडा राहिला आहे. त्यामुळे कितीही बदल घडल्याचा प्रयत्न तालिबान्यांनी केला तरी त्यांचे खरे रूप हळूहळू समोर येत असल्याचं या फतव्याच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular