23.1 C
Ratnagiri
Saturday, January 11, 2025

दहा वर्षांतील जन्मदाखल्यांची चौकशी करा – भाजपची मागणी

तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्मदाखला...

एलपीजी वाहतूक विरोधात ग्रामस्थ संतप्त, अहवालाची प्रतीक्षा

वायू गळतीच्या घटनेनंतर तूर्तास बंद केलेली एलपीजी...

समुद्रात एलईडी लाईट पुरवणारी बोट पकडली, कस्टमच्या गस्ती पथकाची कारवाई

सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गस्ती पथकाने समुद्रात...
HomeChiplun'त्या' वाळू उपशावर कारवाईचे आदेश - जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

‘त्या’ वाळू उपशावर कारवाईचे आदेश – जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

काही महिन्यांपासून रात्रंदिवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही संक्शन पंपाने वाळू उपसा येथील करबंवणे-बहिरवली खाडीत अवैधपणे सुरू आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी होत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीर दखल घेत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना नुकताच एका पत्राद्वारे जाब विचारला आहे. याबाबत तातडीने कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तालुक्यातील करंबवणे-बहिरवली खाडीत गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात असल्याची ओरड सुरू आहे. याबाबत संबंधित मंडल अधिकारी तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. वाळू उत्खननासह होणाऱ्या चोरट्या वाहतुकीच्याही अनेक तक्रारी चिपळूण तहसीलदार व महसूल विभागाकडे सातत्याने फोनद्वारे झाल्या आहेत; मात्र तरीही कारवाई होत नाही.

त्यामुळे चोरटा वाळू व्यवसाय तेजीत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा खनीकर्म विभागाने येथे कारवाई केली होती; मात्र त्यानंतरही चोरटा वाळू व्यवसाय सुरू आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने संक्शन पंपाने वाळू उत्खनन करण्यास बंदी घातली आहे. संक्शन पंपाने वाळू उपसा केल्याने होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली आहे; मात्र तरीही करंबवणे, मालदोली गावातून संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा अवैध बेकायदेशीर आणि विना रॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. वाळू उत्खनन संक्शन पंपाने होत असल्याबाबतचे तीन तक्रार अर्ज चिपळूण तहसीलदार लोकरे यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारअर्जात नमूद केले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या विषयी गंभीरपणे दखल घेत याबाबतचा जाब विचारला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular